Wed, March 29, 2023

केस मागे घेण्याकरता धरणगुत्ती येथे एका महिलेला मारहाण
केस मागे घेण्याकरता धरणगुत्ती येथे एका महिलेला मारहाण
Published on : 23 February 2023, 7:05 am
केस मागे घेण्यासाठी केली मारहाण
शिरोळ ः धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथे एकाने दाखल केलेली केस मागे घेणे घेण्यासाठी त्याच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. किरण सिद्धाप्पा शेट्टी, रवी सिद्धाप्पा शेट्टी व पार्वती सिद्धाप्पा शेट्टी (रा. माळ भाग धरणगुत्ती) यांच्या विरोधात शिरोळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदा दयाराम रणदिवे यांनी शिरोळ पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की मुलगी रोहिणी हिच्या पतीने दाखल केलेली केस मागे घे म्हणून, किरण शेट्टी व रवी शेट्टी यांनी रोहिणीला शिवीगाळ केली. तसेच लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून पार्वती शेट्टी हिने रोहिणीला मारहाण केली असल्याची फिर्यादीत म्हटले आहे.