Tue, March 21, 2023

चैत्र वारी पायी दिंडीचे आयोजन
चैत्र वारी पायी दिंडीचे आयोजन
Published on : 7 March 2023, 1:42 am
चैत्र वारी पायी दिंडीचे आयोजन
शिरोळ ः शिरोळ ते पंढरपूर चैत्र वारी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. २६ ते ३१ मार्चअखेर सहा दिवस पायी दिंडी होणार आहे.
समस्त शिरोळकर वारकरी संप्रदाय व गुरुप्रसाद इंडस्ट्रीजचे प्रमुख, उद्योगपती दादासाहेब इंगळे यांच्या सहकार्यातून चैत्र वारी पायी दिंडी सोहळा आयोजित केला जात आहे. दिंडीमध्ये ३००हून अधिक स्त्री-पुरुष भाविक व वारकरी सहभागी होत असतात. २६ मार्चला सकाळी सात वाजता राजाराम महाराज यांच्या उपस्थितीत वीणापूजन व दिंडी प्रस्थान, नदीवेस हनुमान मंदिर येथून होणार आहे. इच्छुकांना किरण माने, सर्जेराव माने, विलासराव गावडे, शंकर गावडे, भरत रोडे यांच्याकडे नावे नोंद करण्याचे आवाहन केले आहे.