आंदोलन अंकुश ची 9 नोव्हेंबरला  एल्गार सभा

आंदोलन अंकुश ची 9 नोव्हेंबरला एल्गार सभा

‘आंदोलन अंकुश’ ची
९ नोव्हेंबरला एल्गार सभा

शिरोळ, ता.१३ः ऊसदराच्या प्रश्नावर आंदोलन अंकुश संघटनेची एल्गार सभा ९ नोव्हेंबर रोजी शिरोळच्या छत्रपती शिवाजी चौकात होणार असल्याची माहिती ‘आंदोलन अंकुश’ चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी आज पत्रकार बैठकीत दिली.

चुडमुंगे म्हणाले, ‘ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवून ते प्रश्न सरकार दरबारी व प्रसंगी कोर्टात मांडून ते मुळापासून सोडवणे, हा आमच्या संघटनेचा नेहमीच प्रयत्न असतो. उसाला दुसरा हप्ता ५०० रुपये मिळावा व येत्या हंगामात पहिली उचल एकरकमी ३५०० रुपये मिळावी, ही मागणी आम्ही गेली चार महिने लावून धरली आहे. तथापी कारखाने जुमानायला तयार नाहीत. कारखान्यांच्या विरोधात आता आरपारची लढाई करावी लागणार आहे. त्याची दिशा आणि धोरण काय असावे हे एल्गार सभेत शेतकऱ्यांच्या संमतीने ठरवले जाणार आहे.
उसाच्या वजनातील काटामारी रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालकीचा काटा आम्ही घोषणा केल्याप्रमाणे उभा केला आहे. तो या हंगामात शेतकऱ्यांच्या उसाचे वजन करण्यास उपलब्ध होईल. उसाचा दुसरा हप्ता दिल्याशिवाय व पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखान्याच्या तोडी घेऊ नका हे सांगण्यासाठी १ नोव्हेंबरला शिरोळ तालुक्यात मोटरसायकल रॅली काढणार आहे.’
पत्रकार बैठकीस ‘आंदोलन अंकुश’चे जिल्हा प्रमुख राकेश जगदाळे, उपाध्यक्ष उदय होगले, तालुकाध्यक्ष दीपक पाटील,संभाजी शिंदे, मुस्लिम आघाडी प्रमुख रशीद मुल्ला, अक्षय पाटील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com