महात्मा बसवेश्वर यांच्या आदर्श विचाराची आजच्या लोकशाहीला गरज- आनंद कर्णे

महात्मा बसवेश्वर यांच्या आदर्श विचाराची आजच्या लोकशाहीला गरज- आनंद कर्णे

बसवेश्‍वरांच्या आदर्श विचाराची
लोकशाहीला गरज : आनंद कर्णे
शिरोळ येथे जयंती उत्सव समितीतर्फे व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
शिरोळ, ता. १३ : महात्मा बसवेश्‍वरांनी खऱ्या अर्थाने लोकशाहीची मूल्ये रुजवली असल्यामुळे त्यांना लोकशाहीचे जनक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यांच्या आदर्श विचाराची गरज आजच्या लोकशाहीला आहे, असे प्रतिपादन व्याख्याते आनंद कर्णे (नांदेड) यांनी केले. अध्यक्षस्थानी भाजप युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष डॉ. अरविंद माने होते.
शिरोळ येथील श्री महात्मा बसवेश्‍वर जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित व्याख्यानमालेत कर्णे यांनी ‘बसव प्रणित लोकशाही ते आजची लोकशाही एक चिंतन’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. कर्णे म्हणाले, ‘‘महात्मा बसवेश्‍वर यांच्या मते लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली शासन यंत्रणा म्हणजे लोकशाही होय. त्यांनी
समतेच्या विचारावर विश्‍वास ठेवून लोकशाहीचा पाया घातला. महात्मा बसवेश्‍वर यांनी १२ व्या शतकात प्रथमतः लोकशाहीची मूल्ये रुजविली. स्त्रियांना शिक्षण व पूजेचा अधिकार दिला. प्रत्येकाला ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग मिळविण्याचा अधिकार दिला. १२ व्या शतकात माणसाला सन्मान नसताना लोकशाहीची मूल्ये रुजविली. म्हणूनच खऱ्या अर्थाने लोकशाहीचे जनक महात्मा बसवेश्‍वर आहेत.
भारतीय लोकशाही समजून घेताना महात्मा बसवेश्‍वरांची लोकशाही समजून घेणे महत्त्वाचे आहे. एखाद्या समस्येवर, उणीवेवर चिंतन करून, चर्चा करून वचनांची निर्मिती केली. बसवेश्‍वरांचे वचन म्हणजेच कायदा १२ व्या शतकात अनुभव मंटपात निर्मिती केली.’’ दरम्यान, व्याख्यानमालेत श्रोता प्रोत्साहन बक्षीस योजना राबविली गेली. रोज महिला, पुरुष, युवती, पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी अशा गटांसाठी १५ बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी सरपंच शिवाजीराव माने-देशमुख यांच्यासह शरण व शरणी उपस्थित होते. मनोजकुमार रणदिवे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महावीर कुंभार यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com