वृक्षसंवर्धनासाठी शिरोळमध्ये
एक मंडळ एक झाड उपक्रम

वृक्षसंवर्धनासाठी शिरोळमध्ये एक मंडळ एक झाड उपक्रम

वृक्ष संवर्धनासाठी शिरोळमध्ये
‘एक मंडळ, एक झाड’ उपक्रम
पहिल्या टप्प्यात शहरात १०० झाडे लावण्याचा संकल्प
शिरोळ, ता. १ : वाढते प्रदूषण टाळण्याकरिता व पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून, शिरोळ शहरात ‘एक मंडळ, एक झाड’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात नगरपरिषदेत झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात शहरात १०० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
येथील शक्तिजित गुरव यांनी समाज माध्यमातून एक मंडळ एक, झाड हा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या अध्यक्षतेखाली तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी शहरातील जुना कुरुंदवाड रस्ता, मौजे आगर रस्ता, क्रांतिसिंह चौक, विजयसिंह पाटील नगर, घालवाड रस्ता, अजिंक्यतारा मंडळ, जय भवानी चौक, बुवाफन महाराज मंदिर परिसर यासह अन्य ठिकाणी जागा उपलब्ध करून नगरपरिषद आणि सार्वजनिक तरुण मंडळातर्फे सुमारे १०० झाडे लावण्यात येणार आहेत. या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सार्वजनिक तरुण मंडळांबरोबरच सामाजिक संस्थांनी घेतली आहे. तसेच ऑक्सिजन पार्क उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे यावेळी ठरले. झाडांना लागणारी माती, खते, पाणी याचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे.
यावेळी शहर समन्वयक साहिल मकानदार, शक्तिजित गुरव, आनंदराव माने-देशमुख, आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, डॉ. सुरेश शेलार, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील बागडी, चिंतामणी गोंदकर, विजय पट्टणशेट्टी, प्रतीक धर्माधिकारी, साजिद अत्तार, निखिल मिणचे यांच्यासह विविध तरुण मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
--------------
चौकट
रोटरी, पालिकेकडून मदत
शिरोळ रोटरी क्लबने २५ झाडे व त्यांना लागणारे झाडांचे संरक्षक कवच देण्याचे जाहीर केले. वृक्षारोपण करण्यासाठी लागणाऱ्या मदतीबरोबरच नगरपालिकेकडून झाडे आणि झाडांचे संरक्षण कवच उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com