‘लायन्स क्लब’च्या अध्यक्षपदी चुडमुंगे

‘लायन्स क्लब’च्या अध्यक्षपदी चुडमुंगे

01571
बुधाजी चुडमुंगे

‘लायन्स क्लब’च्या
अध्यक्षपदी चुडमुंगे
शिरोळ : लायन्स क्लब ऑफ शिरोळच्या अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते बुधाजी चुडमुंगे, सचिवपदी अमोल देशमुख, खजिनदारपदी अभिजित गुरव आणि उपाध्यक्षपदी रामप्रसाद पाटील यांची एकमताने निवड केली आहे. लायन्स क्लब ऑफ शिरोळचे अध्यक्ष सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि झोन अध्यक्ष सचिन माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्स क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी सदस्यांची विशेष बैठक झाली. यात अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष व खजिनदार यांच्या निवडी सर्वांनुमते केल्या. लायन्स क्लबचे सदस्य किशोर पाटील रेंदाळकर, सनीसिंग पाटील, महेश मोरे, प्रतापसिंह पाटील, डॉ. विशाल चौगुले आदी उपस्थित होते.
-----------
04503
पूजा टेळे

कोरोची उपसरपंचपदी
पूजा टेळेंची निवड
कबनूर ता. १० : कोरोची (ता. हातकणंगले) उपसरपंचपदी पूजा नागनाथ टेळे यांची निवड झाली. गटांतर्गत ठरल्याप्रमाणे उपसरपंच विकी माने यांनी पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिकामे झाले होते. अध्यक्षस्थानी सरपंच डॉ. संतोष भोरे होते. ग्रामपंचायतीमध्ये भाजप ४, ताराराणी विकास आघाडी ४, अपक्ष २ व एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे सरपंच १ यांच्या आघाडीची सत्ता आहे. उपसरपंचपदासाठी सरपंच वगळता उर्वरित १० जणांमध्ये चिठ्ठ्या टाकून उपसरपंच निवड करायचे ठरले होते. विरोधी गटातर्फे कोमल कांबळे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा पराभव झाला. ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे, अभिनंदन पाटील आदी उपस्थित होते.
-----------
ःपेन्शनधारकांच्या
मागण्यांसाठी धरणे
शिरोळ : पेन्शनधारकांच्या विविध मागण्यांसाठी जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
निवेदन निवासी नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना दिले. कार्यवाही न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशाराही दिला. अभिजित पाटील, आशाराणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यात सुकुमार नागावे, मंगल आळतेकर, विजया पाटील, सुवर्णा पाटील, संतोष साबळे, प्रमोद साळुंखे, सर्जेराव जाधव, दिलावर मणेरी, विजय मगदूम, राहूल वठारे, आदी सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com