‘संजय गांधी’चे ७७० प्रस्ताव मंजूर

‘संजय गांधी’चे ७७० प्रस्ताव मंजूर

Published on

‘संजय गांधी’चे ७७० प्रस्ताव मंजूर
सकाळ वृत्तसेवा
शिरोळ, ता. ४ ः संजय गांधी निराधार व स्वावलंब योजनेअंतर्गत शिरोळ तालुक्यातील ७७० लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजनेची बैठक योजनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
बैठकीत प्रशासनाकडे आलेल्या प्रस्तावांची छाननी केली. यामध्ये कागदपत्रांची पडताळणी केली. त्यामध्ये २३० संजय गांधी निराधार योजनेचे व ५४० श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर केले. तहसीलदार तथा योजनेचे सचिव अनिल कुमार हेळकर, सदस्य अजिंक्य पाटील, संजय शिंदे, अफसर पटेल, माधुरी टाकारे, केशव कृष्णा राऊत, महादेव कोळी उपस्थित होते.
अपूर्ण कागदपत्रांची तपासणी करून कागदपत्रे योग्य असल्यास पुढील बैठकीत चर्चा करून ती मंजूर करण्यात येतील. अपूर्ण कागदपत्र असलेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे त्वरित पूर्ण करून विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.