भुखंडाच्या ताब्यासाठी मौजे आगरला उपोषण

भुखंडाच्या ताब्यासाठी मौजे आगरला उपोषण

भूखंडाच्या ताब्यासाठी
मौजे आगरला उपोषण
शिरोळ : मौजे आगर (ता. शिरोळ) येथील गावठाण हद्दीतील शासनाकडून दिलेल्या भूखंडाचा ताबा द्यावा, या मागणीसाठी ग्रामपंचायतीसमोर चार ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बाबासाहेब चुडमुंगे, मीना कलमाटे, जयश्री चव्हाण व रमेश दाभाडे उपोषणास बसले आहेत. याबाबत ग्रामपंचायतींचे प्रशासक तथा ग्राम विकास अधिकारी टोणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘आंदोलनकर्त्यांना वाटप केलेल्‍या भूखंडाचा ताबा ग्रामपंचायतीकडे नसून, तलाठी व तहसीलदार कार्यालयाकडून भूखंड वाटप केले होते. ग्रामपंचायतीकडे याबाबत कोणताही लेआऊट अथवा आदेश नाही. तसेच दुसरे भूखंड देण्याचा अधिकार ग्रामपंचायतीस नसल्याने याबाबत आपण महसूल प्रशासनाशी संपर्क साधण्याचे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना दिले आहे.’
---------------------------
स्मार्ट मीटर योजना
रद्दची शिवसेनेची मागणी
आजरा : ग्रामीण भागातील नागरिकांना स्मार्ट मीटरची योजना परवडणारी नाही. याला विरोध असून स्मार्ट मीटरची योजना तत्काळ रद्द करावी, अशी मागणी आजरा तालुका उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने केली आहे. यासह विविध मागण्यांचे निवेदन आजरा तालुका वीज वितरण कंपनीचे उपअभियंता सुहास मिसाळ यांना दिले आहे. निवेदनावर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, महेश पाटील, राजकुमार भोगण, राजू बंडगर आदींच्या सह्या आहेत.
-------------
फांदी पडल्याने
वाहतूक विस्कळीत
पेठवडगाव : वडगाव नगरपालिका चौक ते हातकणंगले रोडवरील एस. टी. स्टॅन्डजवळ झाडाची फांदी रस्त्यात कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. ही घटना पहाटे घडल्याने कोणतीही हानी झाली नाही. रस्त्याला पर्यायी मार्ग असल्यामुळे त्यामार्गाने वाहतूक वळवली. हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असल्यामुळे झाड बाजूला करण्याचे काम कर्मचाऱ्यांनी केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com