Thur, Feb 2, 2023

शिरोली : नवजीवन विद्यानिकेतन विद्यार्थ्यांनी भरविला बाजार
शिरोली : नवजीवन विद्यानिकेतन विद्यार्थ्यांनी भरविला बाजार
Published on : 8 January 2023, 12:20 pm
नवजीवन विद्यानिकेतनमध्ये आठवडा बाजार
शिरोली पुलाची : येथील नवजीवन विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, नफा, तोटा, व गणितीय ज्ञान यांची संकल्पना दृढ होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणलेल्या वस्तूच्या विक्रीचे आठवडा बाजार उपक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी वस्तुची दुकाने मांडून वस्तूची विक्री केली. यामध्ये भाज्या, फळे, स्टेशनरी, खेळणी, किराणा माळ, खाद्यपदार्थ आदी प्रकारच्या दुकाने उभारली होती. संस्थाध्यक्ष एस. डी. लाड, मुख्याध्यापिका प्रियांका लाड यांच्यासह पालकांनी बाजारास भेट दिली व खरेदी केली. पर्यवेक्षिका बिस्मिल्ला भुसारी, स्नेहल पाटील, सकीना अरब यांनी नियोजन केले.