शिरोली : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

शिरोली : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

विठ्ठल भोगण - 02695
शामराव ऊर्फ भारत परमाज - 02694

शिरोली पुलाचीमध्ये ग्रामविकास
अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
एजंटावरही कारवाई; चार हजार रुपयांची लाच प्रकरण

शिरोली पुलाची, ता. ९ : येथील ग्रामविकास अधिकाऱ्यास एजंटातर्फे चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज पकडले. विठ्ठल भावकू भोगण (वय ५०, सध्या रा. प्लॉट नं. ३०३, गंगाधाम सोसायटी, जाधववाडी, कोल्हापूर, मूळ कोवाड, ता. चंदगड) असे ग्रामविकास अधिकाऱ्याचे तर शामराव ऊर्फ भारत बापू परमाज (६०, रा. शिरोली पुलाची) असे एजंटाचे नाव आहे.
तक्रारदाराच्या घराशेजारी चिकन विक्रीचे दुकान आहे. विक्रेत्याने रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढून घ्यावे, यासाठी ग्रामविकास अधिकारी यांच्या नावे दोनदा अर्ज केला. त्यानंतर अर्जावर कारवाई करावी, यासाठी तक्रारदाराने वारंवार भोगण यांची भेट घेतली; परंतु, भोगण यांनी प्रतिसाद दिला नाही. अतिक्रमण काढायचे असले तर पाच हजार रुपयांची मागणी भोगण यांनी एजंट परमाजतर्फे तक्रारदाराकडे केली. तडजोडीनंतर चार हजार रुपये देण्याचे तक्रारदार व ग्रामविकास अधिकारी यांच्यामध्ये निश्चित झाले. ती रक्कम एजंट परमाजकडे देण्यास भोगण यांनी सांगितले. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने लाच घेताना परमाज यांना पकडले. या दोघांविरोधात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे, निरीक्षक नितीन कुंभार, उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, विकास माने, रुपेश माने, मयूर देसाई, विष्णू गुरव यांनी कारवाई केली.

कोट
शिरोली ग्रामपंचायतमधील पूर्वीच्या भ्रष्ट कारभारीची चौकशी करावी, अशी मागणी यापूर्वीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. आजच्या कारवाईने ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. यामुळे जिल्हा परिषदेने गेल्या पाच वर्षांतील कारभाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी.
-पद्मजा करपे, सरपंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com