अंबपला बिरदेव मंदिराचे कलशारोहण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबपला बिरदेव मंदिराचे कलशारोहण
अंबपला बिरदेव मंदिराचे कलशारोहण

अंबपला बिरदेव मंदिराचे कलशारोहण

sakal_logo
By

02869
अंबप : येथील बिरदेव मंदिर कलशारोहन कार्यक्रमात जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने यांचा सत्कार केला. यावेळी प्रसाद पाटील, मनीषा माने, इंद्रजीत पाटील, राजेंद्र माने, कोंडीबा वाघमोडे, नारायण वाघमोडे आदी उपस्थित होते.
---------
अंबपला बिरदेव मंदिराचे कलशारोहण
टोप, ता. २८ : अंबप (ता. हातकणंगले) येथील बिरदेव मंदिराचा कलशारोहण सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात झाला. धार्मिक विधीतील भाविक व ग्रामस्थांच्या सहभागाने गावात उत्साहाचे व भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयसिंह माने यांच्याहस्ते अभिषेक घालून कलश अर्पण केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने प्रमुख उपस्थित होत्या. विजयसिंह माने म्हणाले, ‘ग्रामस्थांच्या सहकार्यातून व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषद व शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याने मंदिर परिसराचे सुशोभीकरन करण्यात आले. यासाठी धनगर समाज बांधवांनी साथ दिली. या मंदिरामुळे अंबपचे धार्मिक वैभव समृध्द झाले आहे.’
प्रारंभी सरपंच दीप्ती माने यांच्या हस्ते कलशपूजन करून मिरवणुकीला सुरवात झाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून कलश मिरवणूक काढली. राजेंद्र माने, इंद्रजित पाटील, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते. धनगर समाजातर्फे माने कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विजयसिंह माने यांचा सत्कार दत्ता वाघमोडे, सदाशिव वाघमोडे, शिंगू वाघमोडे यांच्या हस्ते केला.