सततच्या  पाणी गळतीने रस्ता झाला खराब  पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना करावा लागतो जीव घेणा प्रवास

सततच्या पाणी गळतीने रस्ता झाला खराब पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना करावा लागतो जीव घेणा प्रवास

00950
वाहत्या पाण्याने रस्ता उखडला
आपटेनगरातील चित्र : टाकी वारंवार ओव्‍हर फ्लो

साने गुरुजी वसाहत ता. ५ : आपटे नगर परिसरामध्ये गेले पंधरा-वीस दिवसांपासून आपटे नगर पाण्याची टाकी ओव्हर फ्लो होऊन नियमितपणे पाणी रस्त्यावर ओढ्यासारखे वाहत असते. पाण्याला फ्लो जास्त असल्याने रस्त्याची एक बाजू पूर्णतः उखडलेली आहे. त्यामुळे मोठमोठे खड्डे पडले असून पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर-राधानगरी रस्ता वर्दळीचा. हाच रस्ता कोकणामध्ये व गोव्याला जातो. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी या मार्गावर असते. तसे वडापाव यांची संख्या जास्त आहे. सध्या साखर कारखाने सुरू झाल्याने उसाचे भरलेले ट्रॅक्टर यांची वाहतूक रस्त्यावरून रात्री मोठ्या प्रमाणात असते. येथे पाण्याची टाकी ओव्‍हरफ्लो होऊन वाहत आहे. पाणी प्रवाहाच्या मार्गात थेट पाईपलाईन योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ता खोदला होता. त्यामुळे रस्त्यावर असलेली माती वाहून गेली आहे. दिवसेंदिवस खड्डे मोठे होत आहेत. पाण्याची गळती थांबवण्यासाठी पावले उचलली जात नाहीत. सकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना येथून जाताना चिखलयुक्त गाळ रस्त्यावर असल्याने चालताना त्रास जाणवतो. प्रशासन नागरिकांचा किती अंत पाहणार, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान शाखा जलअभियंता प्रिया पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क होऊ शकला नाही.

ाकोट
00949
आपटे नगर परिसराला पाणी गळती चे ग्रहण लागले आहे. आपटे नगर चौकातच चार ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आहे. व्हॉल्व मधून व जलवाहिनीतून लागलेली गळती मोठा अनर्थ घडण्यापूर्वी ताबडतोब काढावेत. अन्यथा आम्हास आंदोलन करावे लागेल.
- विश्वास शिवराम पाटील, उद्योजक

00948
सतत पाणी गळतीमुळे महालक्ष्मी कॉलनी मध्ये आलेला मुख्य रस्ता खराब होत चालला आहे. तसेच रस्त्यावर उतार असल्याने चालत येताना नागरिकांचे तोल जातात. वेळीच उपाययोजना करणे गरजेचे.
- दिलीप सासने, सामाजिक कार्यकर्ते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com