वास्तव व कल्पना यातील द्वंद्व दाखवणाऱ्या ''स्पायडरमॅन'' ने जिंकली रसिकांची मने  सावली नाट्यमहोत्सव चा आज तिसरा दिवस

वास्तव व कल्पना यातील द्वंद्व दाखवणाऱ्या ''स्पायडरमॅन'' ने जिंकली रसिकांची मने सावली नाट्यमहोत्सव चा आज तिसरा दिवस

00960
‘स्पायडरमॅन’ने जिंकली रसिकांची मने
सावली नाट्य महोत्सव ः उलगडले वास्तव, कल्पनेतील द्वंद्व
सकाळ
साने गुरुजी वसाहत ता. ६ ः स्वतःच्या मनोविश्वात कायम सुरू असणाऱ्या वास्तव आणि कल्पना यातील द्वंद्व उलगडण्याचा प्रयत्न ‘स्पायडरमॅन’ नाटकातून झाला. कल्पना म्हटले तर मानवी जीवनाला सुखही देऊ शकते व दुःखही देऊ शकते. त्याकडे तुम्ही कसे पाहता यावर मानवी जीवनाचा आलेख ठरतो. यावर ‘स्पायडरमॅन’ नाटक भाष्य करते. सावली सोशल सर्कलच्या मेरिट इंडियाअंतर्गत निर्मिलेल्या नाटकाचे लेखक विद्यासागर अध्यापक असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. या नाटकाला कोल्हापूर केंद्रामध्ये यावर्षी प्रथम पारितोषिक मिळाले. यावर्षी मुंबई येथे होणाऱ्या काळाघोडा कला महोत्सवामध्ये हे नाटक सादर केले जाणार आहे. या महोत्सवामध्ये भारतातील विविध प्रांतातून आलेल्या निवडक नाटकाचा समावेश असतो. त्या स्पर्धेमध्ये सादर करण्याचा मान पहिल्यांदाच कोल्हापूरच्या ‘स्पायडरमॅन’ नाटकाला मिळाला आहे. कोल्हापूरवासीयांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. यावेळी विमल हुक्केरी, सुभाष साबडे यांच्या हस्ते लेखक दिग्दर्शक विद्यासागर अध्यापक व स्पायडरमॅन टीमचा सत्कार करण्यात आला.

मेरिड इंडिया संस्थेतर्फे आयोजित नाटकाचे निर्मितीप्रमुख किशोर देशपांडे, लेखक दिग्दर्शक विद्यासागर अध्यापक असून त्यांना सुषमा शितोळे यांनी लेखन सहाय्यक केले.
राजन जोशी, उज्वला खांडेकर, प्रमोद फडतरे, निहाल रुकडीकर तसेच सागर कोळी, तातु पुयाम, राहुल पाटील, अमृता खांडेकर यांनी भूमिका बजावली. निर्मिती सहाय्य विनय गोखले, सागर वासुदेवन यांचे असून प्रकाशयोजनेची बाजू नितीश फुलारी, सुधीर फडतरे, समीर पंडितराव यांनी सांभाळली. नेपथ्य इंद्रजीत महाजन, रंगमंच व्यवस्था निखील कांबळे तर महादेव शिंगे यांनी पार्श्वसंगीत दिले.

----------
चौकट
उद्या (ता. ७) सायंकाळी साडेसहाला ‘सारी रात्र ही’ नाटक सादर होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com