नवीन वाशी नाक्याला चिव्यांचा बाजार फुलू लागला  गुढी काठींच्या दरात 30 टक्क्यांची वाढ

नवीन वाशी नाक्याला चिव्यांचा बाजार फुलू लागला गुढी काठींच्या दरात 30 टक्क्यांची वाढ

01394

मेसकाठ्यांच्या किमतीत ३० टक्के वाढ
नवीन वाशी नाक्यावर भरला बाजार ः १५ पासून ३० फुटांपर्यंत उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

साने गुरुजी वसाहत, ता. ४ ः येथे नवीन वाशी नाक्यावर गुढी पाडव्यासाठी मेसकाठ्या विकायला आल्या आहेत. काठ्यांचे दर ३० टक्क्‍यांनी वाढले आहेत. गुढीपाडवा चार दिवसांनी आहे. दोन दिवस आधी ग्राहकांची गर्दी होते, असे विक्रेत्यांनी सांगितले.
चिव्यांचा बाजार म्हणून नवीन वाशी नाक्याची ओळख होती. कोल्हापूरपासून थोडा दूर व निर्जन असणारा हा माळ होता. येथे कोकणातून बांबू, चिवकाठी मोठ्या प्रमाणात यायची. बांधकाम व्यवसायांसाठी चिव्यांचा बाजार म्हणजे खरेदीसाठी मुख्य ठिकाणच होते. परंतु शहराचे नागरीकरण वाढू लागले. जिथे चिव्यांचा बाजार भरत होता. तेथूनच वाहतुकीसाठीचा मोठा रस्ता झाला. कोकणातून बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रकमधून येणारी वाहने इतर वाहतुकीसाठी अडथळे ठरू लागली. त्यामुळे इथला चिव्यांचा बाजार अन्यत्र हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या.२०११ पासून चिव्यांचा बाजार मार्केट यार्डमध्ये स्थलांतरित झाला. तरीही गुढीपाडव्याला काही दिवसांकरिता चिव्यांचा बाजार नवीन वाशी नाका येथे भरतो. गुढीपाडवा नऊ एप्रिलला आहे. त्यानिमित्त गगनबावडा, शाहूवाडी, मलकापूर, कळे, बांबवडे, वारणा कोडोली भागांतून काठ्या येत आहेत. १५ फुटांपासून ३० फुटांपर्यंत काठ्या उपलब्ध असून यावर्षी काठ्यांचे दर ३० टक्क्यांनी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

कोट
01393
गतवर्षीपेक्षा काठयांचे दर ३० टक्क्यांनी वाढले आहेत. पंधरा ते वीस फुटापर्यंतच्या काठयांचे दर सव्वाशे ते दीडशे रुपये, तर वीस फुटांपुढे काठयांचे दर दोनशे ते अडीचशे रुपयेपर्यंत आहेत. काठी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी कमी आहे. गुढीपाडव्याआधी दोन दिवस काठी खरेदीसाठी गर्दी होते.
- प्रदीप नारायण सुर्वे, विक्रेता

01397
पूर्वी चपाती, भाकरीची बुट्टी, लग्नसराईत रुखवतात बांबूपासून बनवलेल्या दुरड्या, सूप ,सुपल्या असायच्या. आता प्लास्टिकच्या वस्तू सहजपणे आकर्षक मिळत असल्याने बुरुड व्यवसायावर संक्रांत आली आहे. गुढीपाडव्याला काठ्या व बांधकामासाठी पायाड, खोरी, कुऱ्हाड, टिकाव यांना लागणारे दांडे बसविण्यापुरता व्यवसाय राहिला आहे.
- लता यल्लाप्पा बुरुड ( विक्रेती)
75363
गुढीपाडव्याला उंच काठी उभारण्याबाबत कॉलन्यांमधून स्पर्धा असते. त्याऐवजी जागेची पाहणी करून गुढीची उंची असावी. काट्यांचे दर खूपच वाढले आहेत.
- सुभाष दत्तात्रय भोई (ग्राहक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com