खचलेल्या बाजू पट्ट्या  देताहेत अपघातास निमंत्रण

खचलेल्या बाजू पट्ट्या देताहेत अपघातास निमंत्रण

01501
खराब बाजूपट्ट्यांचे अपघातास निमंत्रण
आपटेनगर चौकात गळतीमुळे समस्या; रस्ताही उखडला, दुरुस्तीची गरज

सकाळ वृत्तसेवा

साने गुरुजी वसाहत, ता. २३ ः आपटेनगर पाण्याच्या टाकी वारंवार ओव्हरफ्लो होऊन वाहणारे पाणी व उपनगराबरोबर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे आपटेनगर चौक ते साने गुरुजी वसाहतीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजू खचल्या आहेत. रस्ता उखडला गेला आहे. बाजूपट्ट्या खचल्याने रात्री वाहनचालकांना खचलेला रस्ता व मुख्य रस्ता यामध्ये पडलेल्या भेगा, खड्डे न दिसल्याने अपघात होत आहेत.
राधानगरीमार्गे गोव्याला जाणाऱ्या रस्त्यावर पर्यटकांची गर्दी असते. वडापवाल्यांची संख्याही मोठी आहे. रात्री पर्यटकांना रस्त्यांचा अंदाज न आल्याने अनेकदा लहान-मोठे अपघात घडले आहेत. अजूनही आपटेनगर जुनी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होत असून रस्त्याच्या बाजूची माती वाहून गेल्याने बारीक खडक, वाळू राहिलेली आहे. यावरून दुचाकी घसरत आहेत. पावसाळ्यामध्ये वाहनचालकांना खचलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण होणे आवश्यक आहे. तसेच आपटेनगर पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर पाणी येणार नाही या पद्धतीने पाणीपुरवठ्यावर नियंत्रण होणे आवश्यक आहे. टाकीची अवस्था नाजूक झाली असून, ती कोसळण्याआधी नवीन टाकीचे काम पूर्ण व्हावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

कोट
1500
थेट पाईपलाईन योजनेतून येणाऱ्या पाण्यासाठी साने गुरुजी ते आपटेनगर मार्गावर जलवाहिनी टाकली आहे. त्यासाठी रस्ता उकरला होता. परंतु जलवाहिनी टाकून चार महिने झाले तरी रस्ता केलेला नाही. त्याच उकरलेल्या रस्त्यावरून आपटेनगर टाकीतील पाणी ओव्हरफलो होऊन रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने बाजूपट्ट्यांची झीज झाली आहे.
- दिलीप सासने, सामाजिक कार्यकर्ते

रस्त्याच्या दोन्ही बाजूपट्ट्या भरून घेण्याचे काम तातडीने सुरू करणार आहे.
- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com