क्रांतिसिंह नाना पाटील नगर मध्ये प्लास्टिक कचऱ्या विषयी शनिवारी होणार प्रबोधन   अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे करणार नागरिकांना मार्गदर्शन  दै. सकाळ च्या प्लास्टिक मुक्त कोल्हापूर चळवळीस वाढू लागले बळ.

क्रांतिसिंह नाना पाटील नगर मध्ये प्लास्टिक कचऱ्या विषयी शनिवारी होणार प्रबोधन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे करणार नागरिकांना मार्गदर्शन दै. सकाळ च्या प्लास्टिक मुक्त कोल्हापूर चळवळीस वाढू लागले बळ.

01544
ज्येष्ठ नागरिक सेवा संघ,
अवनी संस्थेतर्फे कचरा उठाव मोहीम

साने गुरुजी वसाहत, ता. ६ ः दै. ‘सकाळ’च्या प्लास्टिकमुक्त कोल्हापूरच्या चळवळीला बळ देणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व अवनि संस्थेतर्फे प्लास्टिक कचऱ्याच्या दुष्परिणामाविषयी मार्गदर्शन करून कचरा संकलित करून उठाव सुरू आहे. प्रत्येक गुरुवारी अवनी संस्थेतर्फे त्यांच्या वाहनातून प्लास्टिक कचरा संकलित करण्यात येतो. या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अवनि संस्थेच्या अनुराधा भोसले व माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख शनिवारी (ता. ८) सकाळी साडेदहाला सर्वसिद्धी गणेश मंदिर क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. दरम्यान अवनितर्फे प्लास्टिक कचरा संकलन मोहिमेचा आज दुसरा गुरुवार होता. आजही परिसरातून टेम्पो भरून संकलित केलेला प्लास्टिक कचरा उठाव केला. मोहिमेमध्ये ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नलवडे, उपाध्यक्ष गजानन विभूते, सचिव चंद्रकांत बागडी, खजानीस सदाशिव पुंडे, रामचंद्र गायकवाड, बाळासाहेब रावळ, रमेश गुरव, राजू पाडळकर अवनी संस्थेचे जन्मदिन पन्हाळकर, अनिकेत कदम, नयन जाधव, दिलशाद जमादार, कचरावेचक महिला बनाबाई कांबळे यांच्यासह भारती कांबळे मनीषा कुंभार सुनंदा सुतार, सुजाता चिले, जयश्री मोरे, अमृता नलवडे, शेवडे, सायरा शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com