ज्येष्ठ नागरिकांनी वृक्षारोपण करून जपले पर्यावरणाचे भान

ज्येष्ठ नागरिकांनी वृक्षारोपण करून जपले पर्यावरणाचे भान

Published on

01617

ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे
क्रांतिसिंह नाना पाटील नगरात वृक्षारोपण
साने गुरुजी वसाहत, ता. २ ः क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे क्रांतिसिंह नाना पाटील नगर भाजी मंडई ते शामराव कुंभार नगर रस्त्याकडेला ज्येष्ठ नागरिकांनी वृक्षारोपण केले. गणपतराव घाटगे यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले.
मोठमोठे रस्ते, राज्यमार्ग व सिमेंट काँक्रीटच्या भव्य इमारतींमुळे असंख्य वृक्षतोड झाली. हवामानामध्ये विपरीत बदल झाला. त्यामुळे मानवाच्या आरोग्यासोबत जीवितासही धोका होऊ शकतो. याचा विचार करून निसर्गाचा समतोल राखण्याकरिता व भविष्यातील उद्भवणाऱ्या संकटाचा धोका टाळण्याकरिता वृक्षलागवड काळाची गरज आहे. ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या कार्याचा आदर्श घेऊन प्रत्येक संस्था, संघटना व तरुण मंडळांनी शक्य तितक्या लवकर शक्य होईल तेवढे वृक्षारोपण करून आरोग्यदायी नागरी जीवनास हातभार लावावा, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे केले आहे.
यावेळी ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष निवास नलवडे, उपाध्यक्ष गजानन विभूते, खजानीस सदाशिव पुंडे, सचिव चंद्रकांत बागडी, प्रकाश आमते, एकनाथ पोवार, रामचंद्र गायकवाड, बाळासाहेब रावळ, रामचंद्र खोंद्रे, गणपतराव घाटगे, रमेश गुरव, भरत पाटील, प्रकाश कांबळे, अरुण देसाई, मोहन गणबावले यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.