स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण चषक स्पर्धेस प्रारंभ  राज्यभरातून २८० स्पर्धकांनी घेतला सहभाग

स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण चषक स्पर्धेस प्रारंभ राज्यभरातून २८० स्पर्धकांनी घेतला सहभाग

Published on

01622
ीस्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण
चषक स्पर्धेस पीरवाडीत प्रारंभ

राज्यभरातून २८० स्पर्धकांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

साने गुरुजी वसाहत ता. ६ : ८ जुलै १९१० या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मारलेली प्रसिद्ध मार्सेलिस बंदरातील उडी त्रिखंडात गाजली. या उडीने त्यावेळच्या महासत्तांना अचंबित केले. या जगप्रसिद्ध उडीच्या स्मरणार्थ पीरवाडी (ता. करवीर) येथील सावली सोशल सर्कल गतवर्षीपासून शालेय विद्यार्थ्यांकरिता राज्यस्तरीय स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण चषक आयोजित करत आहे. या स्पर्धांना महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना आणि कोल्हापूर जिल्हा हौशी जलतरण संघटना यांनी मान्यता दिलेली आहे. यावर्षी राज्यभरातून २८० स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला.
भोगावती महाविद्यालयाच्या परिसरातील राजर्षी शाहू जलतरण तलावावर स्पर्धा होत आहेत. आज (६ जुलै) सकाळी साडेआठला जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंदराव माने यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय जाधव, प्रफुल्ल जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. पाटील, खराडे, संघटनेचे खजानीस अजय पाठक, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर फडणीस, ॲड. राजन देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्त स्वरदा फडणीस यांनी सावरकरांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. सर्व स्पर्धक शालेय मुलांना सावरकरांच्या जीवनाविषयी माहिती मिळण्यासाठी ही पुस्तिका स्पर्धकांना वितरित करण्यात येईल. स्पर्धा ६ व ७ जुलै दोन दिवस होतील. ७ जुलैला संध्याकाळी ४:३० वाजता स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.