Fri, Feb 3, 2023

वारणा कोतोलीतून ट्राॅली चोरीस
वारणा कोतोलीतून ट्राॅली चोरीस
Published on : 25 January 2023, 6:34 am
कोतोलीत ग्रामपंचायतीच्या ट्रॉलीची चोरी
तुरुकवाडी : कोतोली - वारणा (ता. शाहूवाडी) येथील ग्रामपंचायतीच्या मालकीची ट्रॉली मंगळवारी ( ता. २४ ) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केली. वर्षभरापूर्वी गावातील कचरा निर्मूलनासाठी ट्रॉली खरेदी केली होती. गावच्या तलावानजीक सदरचीही ट्रॉली उभी करण्यात आली होती. याबात ग्रामपंचायतीने शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.