Sat, March 25, 2023

रेठरेत घरकुलांचे भूमिपूजन
रेठरेत घरकुलांचे भूमिपूजन
Published on : 23 February 2023, 2:28 am
01516
वारणा-रेठरेत घरकुल भूमिपूजन
तुरुकवाडी : वारणा - रेठरे (ता. शाहूवाडी) येथे माता रमाई घरकुल योजनेतंर्गत घरकुलांचे भूमिपूजन शाहूवाडीचे गटविकास अधिकारी श्री. बघे यांच्या हस्ते झाले. सरपंच प्रा. वंदना ठोंबरे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य जालिंदर पाटील, सहायक गटविकास अधिकारी पराग कानडे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत गावडे, प्रशांत वास्कर, संगीता जाधव, मनीषा सोरटे, अनिल कांबळे, नामदेव घोलप, गंगाराम घोलप, पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.