उचगांव फलक

उचगांव फलक
Published on

00111
उचगाव : माळीवाडा हायवे पुलाची लांबी, रुंदी वाढण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘गेले खासदार कुणीकडे’ या आशयाचा फलक शिवसेना व काँग्रेसच्या वतीने लावण्यात आला आहे.
...
गेले खासदार कुणीकडे, झळकले फलक
उचगांवातील प्रकार : माळीवाडा येथील प्रलंबित पुलाकडे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
उचगाव, ता. : येथील माळीवाडा हायवे पुलाची लांबी, रुंदी व उंची वाढविण्यासाठी गेले सहा महिने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेसच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. एकवेळ हायवेचे कामही बंद पाडले. तरीसुद्धा या कामाबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. खासदारांनीही याकडे साफ दुर्लक्ष केले. याचा निषेध करण्यासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘गेले खासदार कुणीकडे’ या आशयाचा फलक माळीवाडा पुलाजवळ शिवसेना व काँग्रेसच्या वतीने लावण्यात आला आहे.
या पुलाच्या पलीकडे उचगाववासियांची शेती आहे. तसेच ऊस वाहतूक व अन्य कामांसाठी जाणे-येणे अडचणीचे ठरत आहे. वैरण भरलेली बैलगाडी देखील पुलाखालून जात नाही. त्यामुळे उचगाववासियांची पूल मोठा करावा, अशी मागणी आहे; परंतु रस्ते विकास महामंडळ याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी व शिवसेना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फलक लावला.
यावेळी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, दिनकर पोवार, तालुकाप्रमुख विनोद खोत, दीपक पाटील, दीपक रेडेकर, महेश जाधव, युवासेनेचे तालुकाप्रमुख योगेश लोहार, विक्रम चौगुले, बाबुराव पाटील, दीपक पोपटाणी, सुनील पारपाणी, राहुल मोळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakal Impact: PMC Pushes for Energy Conservation
Dal chaval Recipe
PWD Minister Shivendrasinhraje Bhosale
Amravati MLC Election Result 2026
Marathi News Esakal
www.esakal.com