खाद्य महोत्सवाला प्रतिसाद कुंकुमार्चन सोहळ्यात गर्दी

खाद्य महोत्सवाला प्रतिसाद कुंकुमार्चन सोहळ्यात गर्दी

00132
उचगाव : येथे महिला महोत्सवात कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन केले होते. यात सहभागी महिला.
00131
उचगाव : येथील महिला महोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी आमदार ऋतुराज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

खाद्य महोत्सवाला
उचगावला प्रतिसाद
महिला महोत्सव; कुंकुमार्चन सोहळ्यास गर्दी
सकाळ वृत्तसेवा
उचगाव, ता. १० : येथे महिला महोत्सवातील खाद्य महोत्सवाला प्रतिसाद मिळाला. बचत गटातील महिलांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. त्याचा आस्वाद उचगावकरांनी घेतला. ऋतुराज पाटील यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत मार्गदर्शन केले. यावेळी आयोजित कुंकुमार्चन सोहळ्यासही महिलांनी गर्दी केली होती.
उचगाव येथे ग्रामपंचायतीतर्फे चार दिवसीय महिला महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये दोन दिवस खाद्य महोत्सव आयोजित केला होता. यावेळी सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच सारिका माने, सदस्य सुनीता चव्हाण, नीता हावळ, शिवानी पाटील, वैजयंती यादव, शीला मोरे, अनुराधा वाईंगडे, मयुरा चव्हाण, राहुल मोळे, सूरज पाटील, अरविंद शिंदे, श्रीधर कदम, शामराव यादव, राजू यादव, पृथ्वी चव्हाण, महेश जाधव, श्रेयस कदम, मधुकर चव्हाण, दिनकर पोवार, बचत गटांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.
--------------
चौकट
उचगावमध्ये प्रथमच कुंकुमार्चन सोहळा
उचगावमध्ये प्रथमच कुंकुमार्चन सोहळा आयोजित केला होता. त्याला प्रतिसाद मिळाला. ग्रामपंचायतीतर्फे पूजासाहित्य देण्यात आले. ग्रामपंचायत सदस्यांनी नियोजन केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com