प्रिन्स शिवाजी'' च्या न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (NIT) काॅलेजला AICTE ची मान्यता

प्रिन्स शिवाजी'' च्या न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (NIT) काॅलेजला AICTE ची मान्यता

पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू
करण्यास ‘न्यू पॉलिटेक्निक’ला मान्यता

उचगाव, ता. २ः श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संस्थेच्या येथील न्यू पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये पदवी अभियांत्रीकी अभ्यासक्रम सुरू करण्यास नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून अंतिम मान्यता मिळाली. तसेच न्यू पॉलिटेक्निकचे नामांतर आता नव्याने न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) असे झाल्याची माहिती चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेत डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज सुरू व्हावे ही संस्थेचे पदाधिकारी, सभासद, माजी विद्यार्थी, हितचिंतक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची इच्छा पूर्ण झाल्याचेही ते म्हणाले.
न्यू पॉलिटेक्निक आता नव्या रूपात देशपातळीवर नावलौकिक प्राप्त करेल असा विश्वास अध्यक्ष बी. जी. बोराडे यांनी व्यक्त केला.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून मेकॅनिकल ॲन्ड मेकॅट्रॉनिक्स (ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग), इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड पॉवर, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर सायन्स (एआयएमएल) हे उदयोन्मुख कल असलेले डिग्री कोर्सेस तर ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर, एआयएमएल हे डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध असतील अशी माहिती प्राचार्य तथा संस्था विकास अधिकारी डॉ. संजय दाभोळे यांनी दिली. संस्थेचे व्हा. चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजाननीस वाय. एस. चव्हाण यांचे सहकार्य लाभले आणि प्रशासकीय अधिकारी
संदीप पंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
पत्रकार परिषदेस रजिस्ट्रार डॉ. नितीन पाटील, विभागप्रमुख सुभाष यादव, संग्रामसिंह पाटील, सुहास देशमुख, बाजीराव राजिगरे, दिपक जगताप, विक्रम गवळी, प्रविण जाधव आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com