हद्दवाढ विरोधी कृती समितीचा 14 रोजी 19 गावे बंद ठेवण्याचा निर्णय सुधारित बातमी

हद्दवाढ विरोधी कृती समितीचा 14 रोजी 19 गावे बंद ठेवण्याचा निर्णय सुधारित बातमी

Published on

00391
उचगाव ः येथे हद्दवाढविरोधी कृती समितीच्या बैठकीत बोलताना हद्दवाढविरोधी कृती समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण. शेजारी १९ गावांचे सरपंच व पदाधिकारी.

शहर हद्दवाढविरोधात रविवारी १९ गावे बंद
कृती समितीच्या एल्गार सभेत निर्णय; जबरदस्तीने प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
उचगाव, ता. १० ः येथे हद्दवाढविरोधी कृती समिती आयोजित एल्गार सभेत रविवारी (ता. १४) १९ गावे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कृती समितीचे अध्यक्ष व उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण होते.
सरपंच चव्हाण म्हणाले, ‘कोल्हापूरमधील अनेक प्रश्नाला भिजत घोंगडे ठेवण्याचे काम महापालिका करत आहे. ग्रामीण भागातील जनता ग्रामपंचायतकडून मिळणाऱ्या सुविधांबद्दल समाधानी आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता महापालिकेत समाविष्ट होण्यास तयार नाही, तरी बळजबरीने किंवा जबरदस्तीने हद्दवाढ करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडू.’
गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील यांनी आम्ही आमच्या गावचा विकास करण्यास समर्थ असल्याचे सांगितले.
सरपंच अश्विनी शिरगावे म्हणाल्या, ‘महापालिकेने आपले सर्व प्रश्न सोडवावेत, त्यानंतरच आमच्या गावाकडे वक्रदृष्टी दाखवावी.’
शिवसेनेचे राजू यादव यांनी हद्दवाढ करण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना अग्रभागी राहील, असे सांगितले.
संजय चौगुले यांनी पहिल्यांदा कोल्हापूर शहराचा चांगला विकास करा, असे आवाहन केले.
कृती समितीचे उपाध्यक्ष नारायण गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोरा-बाळांसह जनावरे घेऊन मोर्चा काढण्याचा इशारा दिला.
अमर मोरे, पाचगाव सरपंच प्रियांका पाटील, मोरेवाडी सरपंच ए. बी. कांबळे, उचगावचे उपसरपंच तुषार पाटील, मनसे तालुकाप्रमुख अभिजित पाटील उपस्थित होते.
उजळाईवाडी सरपंच उत्तम आंबवडे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. ए. बी. कांबळे यांनी आभार मानले. किरण अडसूळ यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट
हद्दवाढ प्रस्तावातील १९ गावे
उचगाव, उजळाईवाडी, पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव कळंबे तर्फे ठाणे, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी
गडमुडशिंगी, गांधीनगर, वळीवडे, शिरोली पुलाची, नागाव, शिये, वडणगे, आंबेवाडी, नागदेववाडी, बालिंगा, पीरवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.