औद्योगिक स्वच्छतेच्या उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योगांना सन्मानित करणार ; एमआयडीसी अधीक्षक सुधीर  नागे

औद्योगिक स्वच्छतेच्या उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योगांना सन्मानित करणार ; एमआयडीसी अधीक्षक सुधीर नागे

03370

गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतीत स्वच्छता अभियान

उजळाईवाडी; ता. ६ ः औद्योगिक वसाहती स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून अंतर्गत व परिसर स्वच्छतेबाबत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योगांना लघु, मध्यम व मोठ्या उद्योग प्रकारांमध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे पुणे परिक्षेत्राचे अधीक्षक सुधीर नागे यांनी येथे सांगितले. ते गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये पर्यावरण दिनानिमित्त आयोजित स्वच्छता अभियानाप्रसंगी बोलत होते.
गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतीमधील परिसरात गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, प्रदूषण नियंत्रक मंडळ, कोल्हापूर यांच्यातर्फे व विद्या प्रबोधिनी, कोल्हापूरचे उदय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत गोशिमा कार्यालयाच्या आवारात मंगळवारी (६ जून) स्वच्छता केली.
यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता सुधीर नागे यांचा गोशिमाचे अध्यक्ष दीपक चोरगे व संचालक सचिन शिरगांवकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. स्वच्छता अभियानवेळी प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, कार्यकारी अभियंता ए. ए. ढोरे, उपअभियंता एस. व्ही. अपराज, सांगलीचे नूतन कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे, उपप्रादेशिक अधिकारी अर्जुन जाधव, क्षेत्रीय अधिकारी संजय मोरे, वर्षा कदम, सचिन हरबड, गोशिमाचे उपाध्यक्ष स्वरूप कदम, खजिनदार रणजीत पाटील, संचालक राजीव परीख, लक्ष्मीदास पटेल, मोहन पंडितराव, श्रीकांत पोतनीस, प्रसाद गुळवणी, रणजीत मोरे, निमंत्रित संचालक प्रशांत मेहता, रामचंद्र लोहार, सारंग जाधव, अमोल यादव व उद्योजक व कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com