तामगाव- उजळाईवाडी  पर्यायी रस्त्याचा निर्णय मिळकतदारांच्या संयुक्त बैठकीनंतर

तामगाव- उजळाईवाडी पर्यायी रस्त्याचा निर्णय मिळकतदारांच्या संयुक्त बैठकीनंतर

03958

पर्यायी रस्त्याचा निर्णय बैठकीनंतर
तामगाव-उजळाईवाडी मार्ग; उजळाईवाडीत अधिकाऱ्यांची बैठक

सकाळ वृत्तसेवा
उजळाईवाडी, ता. ११ ः विमानतळ हद्दीतून धावपट्टीजवळून जाणाऱ्या तामगाव-उजळाईवाडी पर्यायी रस्त्याचा निर्णय बाधित मिळकतधारकांच्या संयुक्त बैठकीनंतर तातडीने घेण्याचा निर्णय उजळाईवाडीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला.
उजळाईवाडी (ता. करवीर) ग्रामपंचायत कार्यालयात राजू उर्फ सुनील श्रीपती माने यांनी उपाययोजनांची मागणी केली होती. त्यासंदर्भात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. टेंबलाईवाडी, उचगांव ते गडमुडशिंगी ४५ मीटर रुंदीकरण रस्ता चौपदरीकरणाची मागणी केली. शिवाजी विद्यापीठ-सरनोबतवाडी ते विमानतळ रोड २४ मीटरचा रस्ता जिल्हा परिषदअंतर्गत सोडण्यात येणार आहे. उजळाईवाडी तलाव - विमानतळाकडे जाणारा ३० मीटर रुंदीचा रस्ता चौपदरीकरणसाठीचा प्रस्ताव सादर केला आहे.
उजळाईवाडी गाव विहिरीकडून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यासंदर्भातही चर्चा झाली. तामगाव, उजळाईवाडीत नियोजीत १८ मीटरचा बायपास रस्ता मयूर पेट्रोल पंपापर्यंत सर्व्हे होऊन दोन वर्षं झाली. या रस्त्यात ज्यांच्या जमिनी जातात, त्या शेतकऱ्यांची तातडीने स्वतंत्र बैठक घेण्याचे निश्चित झाले.
विमानतळ प्राधिकरण हद्दीतून रस्ता जात असल्याने विमानतळ प्राधिकरण संचालक अनिल शिंदे यांनी ले-आऊटप्रमाणे स्वतंत्र रस्ता मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केल्याची माहिती दिली. यामुळे गोकुळ शिरगाव, तामगाव, नेर्ली, हलसवडे, फाईव्ह स्टार एमआयडीसीकडे जाता येईल. राष्ट्रीय महामार्ग संलग्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १२ मीटर रस्ता करण्यासाठी बांधकाम विभागाकडून उपाययोजना करण्याची मागणी केली. महामार्गावरील पुलाची लांबी रुंदी, उंची वाढविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.
बैठकीस निवासी नायब तहसीलदार भालचंद्र यादव, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता महेश गांजर, सामाजिक कार्यकर्ते राजू माने, पी. एल. नंदिवाले, बी. एल. जाधव, सरपंच उत्तम आंबवडे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, नेर्लीचे माजी सरपंच तथा गोकुळ दूध संघाचे संचालक प्रकाश पाटील, नंदकुमार मजगे, प्रकाश सुर्यवंशी, अशोक लांडगे, चंद्रकांत पंडित, उपसरपंच प्रतिभा पोवार, तंटामुक्ती अध्यक्ष नायकू बागणे, मंडळ अधिकारी भरत जाधव, तलाठी तुषार भोसले, तलाठी निलांबरी पोवार-मोहिते तामगाव, तलाठी अनिकेत गुरव, गडमुडशिंगी, मंडल अधिकारी आदित्य दाभाडे, गडमुडशिंगी कोतवाल सुनील गवळी, भाईजान अन्सारी, विकी मुजावर, अमित मोरेंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com