‘कृष्णा व्हॅली अॕग्री’ सेंटरला राष्ट्रीय पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कृष्णा व्हॅली अॕग्री’ सेंटरला राष्ट्रीय पुरस्कार
‘कृष्णा व्हॅली अॕग्री’ सेंटरला राष्ट्रीय पुरस्कार

‘कृष्णा व्हॅली अॕग्री’ सेंटरला राष्ट्रीय पुरस्कार

sakal_logo
By

‘कृष्णा व्हॅली अॕग्री’ सेंटरला राष्ट्रीय पुरस्कार
उत्तूर : कृषी मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे उत्तूर (ता. आजरा) येथील कृष्णा व्हॅली अॕडव्हान्स्ड अॕग्रीकल्चर फाउंडेशनला २०२२ सालचा ‘सर्वश्रेष्ठ प्रशिक्षण केंद्र’ हा पुरस्कार जाहीर झाला. सदर मानाचा पुरस्कार अॕग्री क्लिनिक अँड अॕग्री बिझीनेस योजनेअंतर्गत असून १२ जानेवारीला भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते वितरीत केला जाणार आहे. कृष्णा व्हॅलीमध्ये २० वर्षात तयार झालेले प्रशिक्षणार्थी, उद्योग प्रस्थापित केलेले बहुसंख्य युवक आणि त्यांच्या कार्यामुळे झालेला कृषी विस्तार यामुळे हा पुरस्कार देणेत आला आहे. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यासाठी चेअरमन प्रवीण लुंकड, सचिव नारायण कामत, अब्दुलवहाब देवर्षी, सचिन पाटील, सुधाकर जोशीलकर यांनी प्रयत्न केले.