पार्वती शंकर विद्यालयात विज्ञान धारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पार्वती शंकर विद्यालयात विज्ञान धारा
पार्वती शंकर विद्यालयात विज्ञान धारा

पार्वती शंकर विद्यालयात विज्ञान धारा

sakal_logo
By

पार्वती शंकर विद्यालयात विज्ञान धारा
उत्तूर ः येथील पार्वती शंकर शैक्षणिक संस्थेत विविध शाळांतील विज्ञान विषयाची आवड असणाऱ्या नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी ‘विज्ञान धारा’ व ‘कुतूहल’ हा कार्यक्रम झाला. डॉ. शरद काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विविध उदाहरणे, कादंबरींचे संदर्भ, ऐतिहासिक-पौराणिक संदर्भ, साहित्यिकांच्या कविता सादर करून मार्गदर्शन केले. ‘कुतूहलरत्न’ पुरस्काराचे मानकरी विद्यार्थी असे ः प्रथम - आदित्य पाटील (पार्वती शंकर विद्यालय), द्वितीय - प्रणाली देसाई (उत्तूर विद्यालय)
तृतीय- अंजली पुंडपळ - (माध्यमिक विद्यालय, आरदाळ). विज्ञानधारा उत्कृष्ट प्रतिक्रिया पुरस्कार- रिया सावंत (पार्वती शंकर विद्यालय). शिक्षक पंडित वंजारे यांनी आभार मानले.