Sun, March 26, 2023

आरदाळला सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार.
आरदाळला सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार.
Published on : 30 January 2023, 12:09 pm
आरदाळला सरपंच, उपसरपंचांचा सत्कार
उत्तूर ः आरदाळ (ता. आजरा) माध्यमिक विद्यालयातर्फे लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार झाला. अध्यक्षस्थानी शिवाजीराव पन्हाळकर होते. मुख्याध्यापक शरद पाटील यांनी स्वागत केले. सरपंच व उपसरपंच यांनी शाळेची ई-लर्निंगची गरज ओळखून दोन टी.व्ही. संच शाळेस भेट दिले. शंकर पावले, शिवाजीराव पन्हाळकर यांची भाषणे झाली. सरपंच रुपाली पाटील, उपसरपंच विद्याधर गुरव, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पोवार, धनाजी ससाणे, संगीता सुतार, मंगल पुंडपळ, स्वप्नाली बांबरे, सुमन सोनार, अमोल बांबरे उपस्थित होते.