उत्तूरला एस. टी. वाहतूक वन-वे होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तूरला एस. टी. वाहतूक वन-वे होणार
उत्तूरला एस. टी. वाहतूक वन-वे होणार

उत्तूरला एस. टी. वाहतूक वन-वे होणार

sakal_logo
By

उत्तूरला एसटी वाहतूक होणार ‘वन-वे’
ग्रामपंचायतकडून नियोजन; कोंडी टाळण्यासाठी पाऊल
उत्तूर, ता. २६ : येथे एसटी बसची वाहतूक वन-वे करण्याचे ग्रामपंचायतीचे नियोजन सुरू आहे. यामुळे प्रवाशी व व्यापारी यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे.
उत्तूर हे पंचवीस खेड्यांना मध्यवर्ती ठिकाण आहे. वझरे, आरळगुंडी (ता.भुदरगड), काळाम्मा बेलेवाडी (ता.कागल) या परिसरातील नागरिक खरेदीसाठी उत्तूरला दररोज येतात. साहजिकच एसटी महामंडळने प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक गावाच्या सोयीनुसार बस सेवा सुरु केली. वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी व बस थांबण्यासाठी पुरेसा जागा उपलब्ध व्हावा यासाठी स्वागत कमान ते भुदरगड पतसंस्था पर्यंत ४० फुट रुंद रस्ता तयार केला. बस सेवा सुरु झाली मात्र भुदरगड पतसंस्था ते लक्ष्मी मंदीर या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्क होवू लागल्याने बस वाहतूकीला अडथळा निर्माण होवू लागल्या यामुळे खेड्याकडे जाणा-या बस दुसऱ्या मार्गाने धावू लागल्या. यामुळे प्रवाशांना त्रास होवू लागला. व्यापारी वर्गाने बस सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी ग्रामपंचायतकडे केली. यांची दखल घेवून ग्रामपंचायतीने या रस्त्यावर पार्किंगसाठी रंगाचे पट्टे मारण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे वझरे, बेडीत, काळाम्मा बेलेवाडी व गारगोटीकडे जाणाऱ्या बसेस भुदरगड पतसंस्था, सदाफुली पतसंस्था, लक्ष्मी मंदिर या मार्गाने जातील. गडहिंग्लज कडे जाणाऱ्या बस बायपास मार्गाने जातील असे नियोजन आहे.
-------------
कोट
प्रवाशी व व्यापारी यांच्या मागणीनुसार या रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी आगारप्रमुख यांची भेट घेतली. पार्किंगसाठी पट्टे मारण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.
- किरण आमणगी, सरपंच
--------------
प्रवाशांच्या सोयीसाठी स्वागत कमान जवळील जागा सुशोभीकरण करुन तेथे बसण्याची सोय करणार आहे. यामुळे गडहिंग्लज व कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल. प्रवाशी रस्त्यावर थांबणार नाहीत.
- राजेंद्र नुल्ले, ग्रामविकास अधिकारी