
उत्तूरला सलोखा प्रमाणपत्र वाटप.
03559
उत्तूर : मुमेवाडी येथील खातेदारांना सलोखा योजना पंचनामा प्रमाणपत्रांचे वाटप करताना तहसीलदार विकास अहिर. शेजारी गटविकास अधिकारी एच. डी. दाईंगडे, आदी.
उत्तूरला सलोखा प्रमाणपत्र वाटप
उत्तूर : महाराष्ट्र शासनाच्या सलोखा योजनेंतर्गत येथील कृष्णाजी रामचंद्र माद्याळकर व ईश्वर कल्लाप्पा मांग यांना आजरा तालुक्यातील पहिले सलोखा योजना पंचनामा प्रमाणपत्र वाटप तहसीलदार विकास अहिर व गटविकास अधिकारी एच. डी. दाईंगडे यांच्या हस्ते झाले. तलाठी कार्यालय उत्तूर येथे कार्यक्रम झाला. मंडल अधिकारी प्रवीण खरात यांनी स्वागत केले. या वेळी तहसीलदार अहिर म्हणाले, ‘‘विविध न्यायालयात जमिनीचे हक्क, ताबा, मोजणी, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदींमुळे तसेच अतिक्रमणामुळे भाऊबंदकीमध्ये उद्भवलेली वादाची अनेक प्रकरणे प्रास्तवित आहेत. ती आपसात मिटावीत यासाठी शासनाने सुरू केलेली सलोखा योजना एक चांगला पर्याय असून, आपापसांत, गटागटांत वाद असलेल्या जास्तीत जास्त लोकांनी एकमेकांच्या सहमतीने या योजनेचा लाभ घ्यावा.’’ या वेळी महसूल अव्वल कारकून दिलीप जाधव, सहायक गटविकास अधिकारी पाटील, स्नेहल कुंभोजकर, संजय कांबळे, युवराज पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते. तलाठी कल्याण सोनवणे यांनी आभार मानले.