Thur, Sept 21, 2023

हेल्पिंग हँड चा दुसरा वर्धापन दिन
हेल्पिंग हँड चा दुसरा वर्धापन दिन
Published on : 31 May 2023, 1:15 am
हेल्पींग हॕंडचा दुसरा वर्धापन दिन
उत्तूर ः येथील हेल्पींग हँड ग्रुपचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त शैक्षणिक आणि शिक्षणपूरक साहित्य संकलन केले. पोलिस दलात भरती झालेल्या किरण बुवा, पूजा धामणकर, साक्षी कामते यांचा सत्कार केला. समाजासाठी सतत सेवा देणाऱ्या ग्रामपंचायत सफाई कामगारांचा, पाणपोईसाठी मदत करणारे समर्थ अॅक्वाचे सतीश राजाराम यांचा सत्कार केला. विवेक दड्डी यांनी मार्गदर्शन केले. सहायक फौजदार बी. एस. कोचरगी, प्राचार्य शैलेंद्र आमणगी, शुभम धुरे, अनिल लोखंडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुहास पोतदार यांनी केले. प्रास्ताविक सौरभ वांजोळे यांनी केले. वैभव गुरव यांनी आभार मानले.