बहिरेवाडी योजनेचे उद्या लोकार्पण

बहिरेवाडी योजनेचे उद्या लोकार्पण

बहिरेवाडी योजनेचे आज लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
उत्तूर, ता. १० : बहिरेवाडी येथील नळपाणी योजनेचे उद्या (ता. ११) दुपारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. पाच कोटींची योजना आहे. यावेळी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, आदी उपस्थित राहणार आहेत.
बहिरेवाडी (ता. आजरा) गाव पूर्वी टँकरग्रस्त होते. ग्रामपंचायतीने १९८७ -८८ मध्ये हणबरवाडी तलावातून पाणी आणले. मात्र, गावची रचना उंचीवर असल्याने जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण वाढले आणि ही योजना वाया गेली. १९९५ मध्ये हणबरवाडी तलावाच्या ठिकाणी पाटबंधारे प्रकल्प मंजूर झाला. जॅकवेल या प्रकल्पात बुडाला. १९९९ मध्ये हणबरवाडी पाटबंधारे प्रकल्पावर आधारित ४९ लाखांची सुधारित पाणीपुरवठा योजना शासनाने मंजूर केली. मात्र, लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणी मार्चनंतर कमी होऊ लागले व शिल्लक पाणी दूषित होऊ लागले. यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणी देण्याचा निर्णय घेतला. जीवन मिशन योजनेंतर्गत पाच कोटी रुपे योजनेचा आराखडा तयार केला. हिरण्यकेशी नदीवर गिजवणे येथे जॕकवेल बांधून तेथून पाणी आणले आहे.
-----------
गावाला नदी अथवा मोठा ओढा नाही. यामुळे पाणी योजनेवर नागरिकांना अवलंबून राहावे लागत होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून या नवीन पाणी योजनेची पूर्तता झाली आहे. ग्रामस्थांना विविध निवडणुकींत दिलेले मुबलक व स्वच्छ पाणी देण्याचे अभिवचन यानिमित्त आम्ही पूर्ण केले आहे.
- वसंतराव धुरे,
अध्यक्ष, आजरा साखर कारखाना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com