वडणगे . ग्रा. पं. जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे ठेवणार दोन हजार ची ठेव.लेक वाचवा अभियानाला बळकटी . | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडणगे . ग्रा. पं.  जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे ठेवणार दोन हजार ची ठेव.लेक वाचवा अभियानाला बळकटी .
वडणगे . ग्रा. पं. जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे ठेवणार दोन हजार ची ठेव.लेक वाचवा अभियानाला बळकटी .

वडणगे . ग्रा. पं. जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे ठेवणार दोन हजार ची ठेव.लेक वाचवा अभियानाला बळकटी .

sakal_logo
By

वडणगे ग्रामपंचायत
मुलीच्या नावे ठेवणार ठेव
महिला सभेत ठराव; ‘लेक वाचवा’ला बळकटी
सकाळ वृत्तसेवा
वडणगे, ता. ३१ : येथील ग्रामपंचायतीने लेक वाचवा अभियानाला बळकटी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी सुकन्या ठेव योजनेंतर्गत गावात ज्या घरात मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या नावे दोन हजार रुपयांची ठेव ग्रामपंचायतीतर्फे पोस्टात ठेवण्यात येणार आहे. महिला ग्रामसभेत याबाबतचा ठराव करण्यात आला. गावातील पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच संगीता पाटील यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर हा पहिलाच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
आज विविध क्षेत्रांत महिलांनी आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र, मुलगा हा वंशाचा दिवा आहे. या भावनेमुळे मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. स्त्री जन्माचे स्वागत व्हावे व मुलीच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीने गावात जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे दोन हजारांची ठेव पोस्टात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १८ वर्षांनंतर जी रक्कम होईल ती संबंधित मुलीला दिली जाणार आहे. २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
---------------
कोट
स्त्री जन्माचे स्वागत हा विचार घराघरांत रुजला पाहिजे. मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे व जनजागृती व्हावी, यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.
- संगीता पाटील, सरपंच