वडणगे महाशिवरात्री यात्रेसाठी लेख--- १ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडणगे महाशिवरात्री यात्रेसाठी लेख--- १
वडणगे महाशिवरात्री यात्रेसाठी लेख--- १

वडणगे महाशिवरात्री यात्रेसाठी लेख--- १

sakal_logo
By

पट्टी ः वडणगे महाशिवरात्री यात्रा विशेष
पट्टीसाठी फोटो - 83482, 1460

01461
83484
(छायाचित्र - पांडुरंग पाटील, वडणगे)


लीड
महालक्ष्मीच्या वास्तव्याने करवीर नगरीची दक्षिण काशी ओळख आहे. शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील वडणगे गावात महाशिवरात्री यात्रा मोठया प्रमाणात भरते. करवीर महात्म्य ग्रंथात उल्लेख असणाऱ्या व भगवान शिवपार्वतीच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या श्री क्षेत्र वडणगे गावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे....

भाविकांचे श्रद्धास्थान
श्री क्षेत्र वडणगे

वडणगेचा उल्लेख प्राचीन करवीर महात्म्य ग्रंथात आहे. गावात ३२ एकर क्षेत्रात शिवपार्वती तलाव विस्तारलेला आहे. संबकेश येथील राजा गौतमी याने वडणगेत वास्तव्य केले होते. संबकेश्‍वराचे तळके असा त्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथात आढळतो. या तलावाशेजारी व पार्वती अशी दोन स्वतंत्र मंदिरे आहेत. अशी मंदिरे असणारे वडणगे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. महाशिवरात्रीदिवशी या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. आसपासच्या खेडयांबरोबरच कोल्हापूर, पुणे, मुंबई याठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने शिवपार्वतीच्या दर्शनासाठी दाखल होतात. यात्रेदिवशी पहाटे सरपंच आणि सदस्यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीस अभिषेक घातला जातो. त्यांनतर टाळ-मृदंगाच्या गजरात देवीची पालखी काढली जाते. यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक देवस्थान समितीने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई केली आहे. ग्रामपंचायत प्रशासन, झाडवाट कुरण मंडळातर्फे विविध स्पर्धा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होतील.

विविध संस्थांची सुवर्ण कामगिरी
* वडणगे सेवा संस्था
जिल्हयातील अग्रेसर संस्था म्हणून ओळख. संस्थेचे २२१० सभासद आहेत. भागभांडवल २ कोटीहून अधिक असून वार्षिक उलाढाल
८५ कोटींवर आहे. ठेवी ४ कोटी ४६ लाखांवर. बँक कर्जे ६ कोटी २ लाखांवर. संस्थेच्या ९ शाखा असून लेखापरीक्षण सतत ‘अ’ वर्ग आहे. पारदर्शी कारभारातून संस्थेने वेगळी ओळख निर्माण केली आहे. सौर सिस्टीम बसवल्याने संस्था विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे.

*पंचगंगा पाणीपुरवठा संस्था
योग्य नियोजन करून संस्थेने ३०० एकर क्षेत्र सिंचनाखाली आणले आहे शेतकऱ्यांच्या थेट बांधापर्यंत संस्थेने पाणी पोचवले. संस्थेचे १३०७ सभासद आहेत. भागभांडवल १० लाखांवर आहे. संस्थेचा निधी ६३ लाखांवर असून ठेवी ९ लाखांहून अधिक आहेत. वार्षिक उलाढाल १ कोटी २० लाख आहे. शेतकऱ्यांच्या विश्‍वासात पात्र ठरलेली संस्था म्हणून परिसरात ओळख आहे.

*शाहू पतसंस्था
माजी जिल्हा परिषद सदस्य बी. एच. पाटील पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आदर्श पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या या संस्थेची स्थापना १९८८ मध्ये झाली. संस्थेकडे २७०६ सभासद असून ठेवी २० कोटी ४२ लाखांवर आहेत. लेखापरीक्षण सतत ‘अ’ वर्ग आहे. कर्जे १० कोटी १० लाखांवर आहे. निधी ५ कोटी ४५ लाख असून भागभांडवल १ कोटी ४ लाखावर आहे.

*वडणगे दूध संस्था
दूध संकलनात अग्रेसर असणारी दूध संस्था आहे. ५७५ सभासद असलेल्या संस्थेची वार्षिक उलाढाल सव्वा कोटी आहे. संस्थेला जास्तीत जास्त दूध उत्पादन करणाऱ्या गाय व म्हैस दूध उत्पादकांना बक्षिसे देऊन त्यांना प्रोत्साहन दिले जाते. सर्वाधिक दूधदर फरक देणारी संस्था. सतत ऑडिट वर्ग ‘अ’ वर्ग असलेल्या संस्थेच्या वाटचालीत संस्थापक सदाशिव पाटील-मास्तर व मार्गदर्शक म्हणून बाजीराव पाटील यांचे मोठे योगदान आहे.

------------
01464
कोट
शिव-पार्वतीच्या पदस्पर्शाने पावन भूमी म्हणजे करवीर काशी. श्री क्षेत्र वडणगेची १८ फेब्रुवारीला महाशिवरात्रीदिनी यात्रा होत आहे. यंदा मोठ्या उत्साहात यात्रा करण्याचे नियोजन ग्रामपंचायत व यात्रा कमिटीने केले आहे. यात्राकाळात मनोरंजनात्मक कार्यक्रम, शर्यती व कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. ग्रामस्थ, तरुण मंडळे, स्थानिक देवस्थान समिती व पोलिस प्रशासनाच्या सहकार्यातून यात्रा निर्विघ्नपणे पार पडेल, अशी अपेक्षा आहे.
- संगीता पाटील, लोकनियुक्त सरपंच