‘गो ग्रीन’मधून ग्राहकांची २६ लाखांवर बचत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गो ग्रीन’मधून ग्राहकांची २६ लाखांवर बचत
‘गो ग्रीन’मधून ग्राहकांची २६ लाखांवर बचत

‘गो ग्रीन’मधून ग्राहकांची २६ लाखांवर बचत

sakal_logo
By

‘गो ग्रीन’मधून ग्राहकांची
२६ लाखांवर बचत
महावितरणची योजना; कोल्हापूर, सांगलीचे चित्र
सुनील स. पाटील : सकाळ वृत्तसेवा
वडणगे, ता. २७ : कोल्हापूर परिमंडळातील २२ हजार ७४ वीज ग्राहकांनी ‘गो ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडून कागदाच्या बिलास नकार दिला आहे. या ग्राहकांना आता नोंदणीकृत ई-मेल च्या माध्यमातून वीज बिल प्राप्त होते. या योजनेमुळे ग्राहकांना प्रत्येक बिलावर दहा रुपयांचा लाभ मिळत असल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ग्राहक वार्षिक २६ लाख ४८ हजार ८८० रुपयांची आर्थिक बचत करीत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील १३ हजार ३७३, तर सांगलीच्या आठ हजार ७०१ वीज ग्राहकांनी गो-ग्रीन सेवेसाठी नोंदणी केली आहे. कोल्हापूर शहरात सर्वाधिक तीन हजार ९४८ इतक्या ग्राहकांनी ही सुविधा स्वीकारली आहे. या योजनेत ९५ हजार ५३ ग्राहक नोंदणी असलेले पुणे परिमंडळ राज्यात पहिल्या स्थानावर आहे. कल्याण परिमंडळ दुसऱ्या, तर भांडुप परिमंडळ तिसऱ्या स्थानावर आहे. कोल्हापूर परिमंडळ या योजनेत सहाव्यास्थानी आहे. राज्यातील तीन लाख ७३ हजार ५५८ ग्राहकांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे.
‘गो ग्रीन’चा पर्याय निवडलेल्या ग्राहकांना कागदी वीज बिल पाठवणे बंद केले जाते. ग्राहक महावितरणच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल अ‍ॅपवर जाऊन ‘गो ग्रीन’चा पर्याय निवडू शकतात.
-------------
कोट.
वीजबिल ई-मेलवर घेणे म्हणजे कागद वाचविणे. त्याद्वारे आपण पर्यावरण संवर्धनास हातभार लावू शकता. महावितरणची गो-ग्रीन सुविधा ती संधी आपणास देत आहे.
- किशोर खोबरे, जनसंपर्क अधिकारी
--------------
गो ग्रीन सेवेतील जिल्ह्यातील ग्राहक
गडहिंग्लज - १६४०
जयसिंगपूर -१७६२
कोल्हापूर ग्रामीण एक - २०९९
कोल्हापूर ग्रामीण दोन २५१०
इचलकरंजी - १४१४