वडणगे पोवार पाणंद मार्गातील तब्बल तीन महिन्याने पथ दिवे सुरु

वडणगे पोवार पाणंद मार्गातील तब्बल तीन महिन्याने पथ दिवे सुरु
Published on

02083
वडणगेतील पथदिवे
तीन महिन्यांनी सुरू
वडणगे, ता. ३० : वडणगे-कोल्हापूरला जोडणारा महत्त्वाचा मार्ग पोवार पाणंद रस्ता तीन महिने अंधारात होता. या मार्गातील प्रवाशांना अंधारातून मार्ग काढत प्रवास करावा लागत होता. अखेर महावितरण कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती केल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी पथदिवे सुरू झाले.
पोवार पाणंद रस्त्यावरून रोज शेकडो प्रवासी ये-जा करतात. २० मे रोजी झालेल्या वादळी पावसाने या मार्गातील झाडे व विजेचे खांब मोडून पडले होते. तेव्हापासून मार्गातील पथदिवे बंद आहेत. खोलगटी तीन नळा येथे विजेच्या तारेवर झाडाची फांदी टेकलेली असल्याने महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रवाशांनी कल्पना देऊनही त्या तारेवरील फांदी काढलेली नसल्याने विद्युतपुरवठा खंडित ठेवला होता. हा मार्ग वडणगेसह पुढील सात-आठ गावांना जोडणारा मार्ग असल्याने रात्री प्रवाशांना अंधारातून प्रवास करावा लागत असे. कायम रहदारीचा रस्ता असल्यामुळे व पुराच्या पाण्यामुळे मार्गातील रस्ता काही ठिकाणी खचला गेला आहे. अंधार असल्याने अपघात होत असत. याबाबत महावितरण अधिकारी व पथदिव्याचे ठेकेदार यांच्याशी बोलून पथदिवे तीन महिने बंद असल्याने होणाऱ्या अडचणी सांगितल्या. सोमवारी महावितरण कर्मचारी व ग्रामपंचायत पथदिव्यांचे ठेकेदार यांच्यामार्फत तारेवर पडलेली झाडाची फांदी काढून वीजपुरवठा सुरळीत केला जाईल; अशी ग्वाही महावितरण अधिकारी युवराज इंदलकर व ठेकेदार कृष्णात कचरे यांनी दिली होती. दरम्यान, पोवार पाणंद कॉर्नरचा हायमस्ट लॅम्पसह रस्त्यावरील सगळे पथदिवेही लवकरच सुरू होतील, असे ठेकेदार कृष्णात कचरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com