वारणा कारखान्याकडे मार्च व एप्रिल महिन्यात गळीतास येणाऱ्या ऊसास जादा दर- अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांची माहीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारणा कारखान्याकडे मार्च व एप्रिल महिन्यात गळीतास येणाऱ्या ऊसास जादा दर- अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांची माहीती
वारणा कारखान्याकडे मार्च व एप्रिल महिन्यात गळीतास येणाऱ्या ऊसास जादा दर- अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांची माहीती

वारणा कारखान्याकडे मार्च व एप्रिल महिन्यात गळीतास येणाऱ्या ऊसास जादा दर- अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांची माहीती

sakal_logo
By

03461

मार्च, एप्रिलमध्ये गळीतास
येणाऱ्या उसास जादा दर

अध्यक्ष आमदार डॉ. कोरे यांची माहिती

वारणानगर, ता. १४ : वारणा साखर कारखान्याकडे मार्च व एप्रिलमध्ये गळीतास येणाऱ्या उसास जादा दर देणार असल्याचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी सांगितले. डिसेंबर २०२२ अखेर एफआरपी प्रतिटन ३०२५ रु.प्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली आहे. तोडणी व वाहतूक कंत्राटदारांचे रक्कमही दिल्याचेही ते म्हणाले.
डॉ. कोरे म्हणाले, ‘आजअखेर ७ लाख ४५ हजार ४० टन ऊसाचे गाळप झाले. सरासरी साखर उतारा ११.९९ टक्के इतका आहे. वीजनिर्मिती प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालू असून ४ कोटी ६१ लाख ८४ हजार ५०० युनिटस् वीज महावितरण कंपनीस निर्यात केली. आजवर ५९ लाख ६ हजार १८२ लाख लिटर इथेनॉल उत्पादन केले आहे.’
१६ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित असून वार्षिक सभेतील घोषणेप्रमाणे वारणा कारखाना कार्यक्षेत्रातून १ मार्च ते १५ मार्चमध्ये गाळपासाठी येणाऱ्या प्रतिटन ऊसास १०० रु. प्रतिटन, १६ मार्च ते ३१ मार्चमध्ये १५० रु. प्रतिटन, १ एप्रिल ते कारखाना संपेपर्यंत येणाऱ्या ऊसास २०० रु. प्रतिटन जादा दर देण्याचा निर्णय संचालकांच्या बैठकीत झाला. ऊस देऊन १६ लाख टनाचे उद्दिष्टपूर्तीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपाध्यक्ष प्रतापराव पाटील व कार्यकारी संचालक शहाजी भगत यांनी केले.