मिरजेतील कन्या महाविद्यालयात १२ रोजी आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ------

मिरजेतील कन्या महाविद्यालयात १२ रोजी आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ------

आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे
मिरजेत १२ रोजी आयोजन
वारणानगर, ता. ८ : मिरजेतील दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीच्या कन्या महाविद्यालयात प्रतिवर्षाप्रमाणे अरविंदरावजी मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा रविवारी (ता. १२) सकाळी १० पासून सुरू होणार आहेत. स्पर्धेसाठी कनिष्ठ गटासाठी व्यसन सोशल मीडियाचे, पालटले चित्र समाजाचे, वाचनाने घडतो माणूस, छत्रपती शिवाजी महाराज : एक युग प्रवर्तक, जगणे महाग होत आहे, पर्यावरणवादी चळवळीतील भारतीय तरुण हे विषय असून पदवी व पदव्युत्तर गटासाठी देश बुद्धाच्या, बुद्धीच्या की युद्धाच्या दिशेने, स्पर्धा परीक्षा : धडपडणारी तरुणाई, छत्रपती शिवाजी महाराज : मॅनेजमेंट गुरू, लोकशाही ते दडपशाही व्हाया ईडी, वृक्षलागवड : शासकीय धोरण आणि वास्तवता हे विषय आहेत. सहा व आठ मिनिटांचा वेळ असेल. सर्व स्पर्धक व सोबत येणाऱ्या शिक्षक व पालकांची भोजनाची सोय केली जाते. स्पर्धा संकेत क्रमांकानुसार घेतल्या जातात. स्पर्धेत सहभागासाठी प्रवेशिका नोंदणी करण्याची अंतिम मुदत ९ फेब्रुवारी आहे, अशी माहिती सचिव राजू झाडबुके, प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com