वारणा शिक्षण संकूलाच्या निळकंठेश्वर उद्यानात महाशिवरात्रनिमित्त भक्ती आणि शक्ती उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारणा शिक्षण संकूलाच्या निळकंठेश्वर उद्यानात महाशिवरात्रनिमित्त भक्ती आणि शक्ती उत्सव
वारणा शिक्षण संकूलाच्या निळकंठेश्वर उद्यानात महाशिवरात्रनिमित्त भक्ती आणि शक्ती उत्सव

वारणा शिक्षण संकूलाच्या निळकंठेश्वर उद्यानात महाशिवरात्रनिमित्त भक्ती आणि शक्ती उत्सव

sakal_logo
By

वारणेला नीलकंठेश्वर उद्यानात उद्या कार्यक्रम
वारणानगर : येथील वारणा शिक्षण मंडळाच्यावतीने नीलकंठेश्वर उद्यानात महाशिवरात्रीनिमित्त शनिवारी (ता. १८)भक्ती आणि शक्ती उत्सव होणार आहे. शनिवारी सकाळी लघुरूद्रपूजा, तीर्थप्रसाद व वारणा भगिनी मंडळाच्या भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम सादर होईल. आमदार डॉ. विनय कोरे यांच्या संकल्पनेतून वेस्टर्न व भारतीय शास्त्रीय संगीताच्या सुरातून ठेका धरायला लावणारा शिवभक्ती व शक्तीचा महिमा सांगणाऱ्या गीतांचा बहारदार कार्यक्रम होईल. ३०० लाईट इफेक्टस्‌च्या झगमगाटात भक्ती व शक्तीचा स्वरार्पण - कोल्हापूर प्रस्तुत सवर - द रॉक बॅन्ड हा अनोखा कार्यक्रम आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन वारणा शिक्षण परिवाराने केले आहे.