बहिरेवाडीत शिवजयंतीनिमित्त 101 नागरिकांचं रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहिरेवाडीत शिवजयंतीनिमित्त  101 नागरिकांचं रक्तदान
बहिरेवाडीत शिवजयंतीनिमित्त 101 नागरिकांचं रक्तदान

बहिरेवाडीत शिवजयंतीनिमित्त 101 नागरिकांचं रक्तदान

sakal_logo
By

B03546
बहिरेवाडीत १०१ दात्यांचे रक्तदान
वारणानगर : शिवजयंतीनिमत्त बहिरेवाडीत भैरोबा तालीम मंडळातर्फे १०१ नागरिकांनी रक्तदान केले. ‘चला माणुसकी जपूया, रक्तदान करुन जीवदान देऊया’ विचारधारेने प्रवृत्त होऊन शिवजयंतीदिनी तालुक्यातील बहिरेवाडीत दरवर्षी रक्तदान शिबिर होते. शिबिराचे उद्घाटन मिरज शासकीय रक्तपेढीचे डॉ. शेंडगे, माजी सरपंच शिरीषकुमार जाधव यांचे हस्ते झाले. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीने रक्तदान केले. सायंकाळी शिवरायांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढली. मिरवणुकीचे उद्घाटन विश्वेश कोरे यांच्या हस्ते झाले. भैरोबा तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जाधव, मयुर जाधव, उपाध्यक्ष स्वप्नील काशीद, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप चव्हाण, १०५ वेळा विक्रमी रक्तदान केलेले वसंत चव्हाण, डॉ. अभिजीत जाधव उपस्थित होते.