वारणा महाविद्यालयातर्फे विविध पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारणा महाविद्यालयातर्फे
विविध पुरस्कार जाहीर
वारणा महाविद्यालयातर्फे विविध पुरस्कार जाहीर

वारणा महाविद्यालयातर्फे विविध पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

03568, 03567
स्नेहा कोरे, शुभलक्ष्मी कोरे, अमृता जाधव, तृप्ती मुळीक, कोमल ढोले


वारणा महाविद्यालयातर्फे
विविध पुरस्कार जाहीर
महिला दिनानिमित्त महिलांचा होणार सन्मान
वारणानगर, ता. ५ : येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातर्फे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. वारणा भगिनी मंडळाच्या उपाध्यक्षा स्नेहा कोरे, सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांना विशेष पुरस्कार, तर न्यायाधीश अमृता जाधव, सिंधुदुर्ग येथील पोलिस कर्मचारी तृप्ती मुळीक, दापोली येथील पोलिस कर्मचारी कोमल ढोले यांना ‘श्रीमती शोभाताई कोरे स्त्री कर्तुत्व सन्मान पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त बुरुवारी (ता. ८) आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते, वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी वासंती रासम यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल, अशी माहिती प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी दिली.
डॉ. चिकुर्डेकर म्हणाले, ‘‘अंबपवाडी येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अमृता जाधव यांनी दिवाणी न्यायाधीशपदी पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केले. पाडळी येथील तृप्ती मुळीक या सध्या सिंधुदुर्ग पोलिस विभागात कार्यरत असून महाराष्ट्र पोलिस विशेष पथकातून त्यांनी गत वर्षात तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री आणि पालकमंत्री यांच्या गाडीचे सारथ्य केले. कोडोली येथील कोमल ढोले या सध्या दापोली येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असून मे २०२२ मध्ये रात्रीच्या वेळी पोलिस ठाण्याला अचानक लागलेल्या आगीत जीवाची परवा न करता पोलिस स्टेशनच्या छतावरती चढून सहकाऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे धाडस दाखवले. या तीनही विद्यार्थिनींनी वारणा महाविद्यालयामध्ये उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षण घेऊन खेळ, क्रीडा राष्ट्रीय छात्र सेना विभागातही चमकदार कामगिरी केली.
या सन्मानार्थ त्यांना ‘शोभाताई कोरे आईसाहेब स्त्री कर्तुत्व सन्मान :२०२३ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत आहे. याबरोबरच वारणा भगिनी मंडळाच्या उपाध्यक्ष स्नेहा निपुणराव कोरे, शोभाताई कोरे महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी विनय कोरे यांना विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत.’’