वारणेत आनंदमेळा''चे उद्घाटन

वारणेत आनंदमेळा''चे उद्घाटन

Published on

04053
वारणेत आनंदमेळाचे उद्घाटन
वारणानगर, ता.३: महिलांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देणारा ''आनंदमेळा'' असून अनेक बचत गटांसह महिलांना उद्योजक बनविण्यात सिंहाचा वाटा असल्याचे मत पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे-जाधव यांनी येथे व्यक्त केले.प्रदर्शनात विक्री सहकुटुंब सहपरिवार खरेदीचा आनंद मनसोक्त लुटण्यासाठी आल्याचेही तहसीलदार
सौ. शिंदे-जाधव यांनी सांगितले. येथील वारणा भगिनी मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या आनंद मेळा प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होते. वारणा भगिनी मंडळाच्या अध्यक्षा स्नेहा कोरे, सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, संचालिका श्रुती कोरे, मंडळाच्या संचालिका उपस्थित होत्या. अध्यक्षा स्नेहा कोरे यांनी स्वागत करून स्टॉल धारकांना चांगल्या स्वरूपाचे मार्गदर्शन केले. वारणा भगिनी मंडळांने निर्मिती केलेल्या दिवाळी गिफ्ट बॉक्सचे अनावरण तहसीलदार माधवी शिंदे - जाधव, अध्यक्षा स्नेहाताई कोरे संचालिका यांच्या हस्ते झाले. संचालिका शर्मिला कुलकर्णी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. संचालिका शोभाताई साखरपे, शर्मिला पवार यांनी सूत्रसंचालन केले. संचालिका शारदा महाजन यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.