आय.टी.आय.च्या विद्यार्थ्यांची ट्रीओ इंटरप्राईजेस शिरोली या कंपनीमध्ये निवड

आय.टी.आय.च्या विद्यार्थ्यांची ट्रीओ इंटरप्राईजेस शिरोली या कंपनीमध्ये निवड

कोरे आयटीआयच्या विद्यार्थ्यांची
ट्रीओ इंटरप्राईजेस कंपनीत निवड

वारणानगर, ता. ६ : येथील तात्यासाहेब कोरे औद्योगिक प्रशिक्षण संस्था वारणानगर संस्थेतील फिटर, इलेक्ट्रिशियन विभागांतील १० विद्यार्थ्यांची ट्रीओ इंटरप्राईजेस, शिरोली नामांकित कंपनीत कँम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली.
कंपनीने गटचर्चा, इंटरव्ह्यू आयोजित करत दोन विभागांमधून विद्यार्थ्यांची निवड केली. विद्यार्थ्यांना ट्रिओ इंटरप्राईजेस शिरोली या नामांकित कंपनीत नोकरीची (शिकाऊ उमेदवारी) संधी मिळाली, अशी माहिती प्राचार्य बी. आय. कुंभार यांनी दिली. कंपनत अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वाहन क्षेत्रातील संबंधित विविध ऑपरेटिंग कंपन्या आहेत. यावेळी संस्थाध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व आपल्या ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी करावा असा सल्ला केला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी, प्राचार्य बी.आय.कुंभार, गटनिदेशक आर.आर.कापरे, आय.टी.आयचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर पी. पी. पाटील, एस. एस. पाटील, बी. टी. वायदंडे, यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सर्व विभागाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समन्वयकांचे व सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

निवड झालेल्या विद्यार्थ्याची नावे अशी:
फिटर- अविनाश पाटील, क्षितिज कांबळे, सागर पाटील, प्रतीक पाटील, सुधर्म डुबल, ऋषिकेश काटे, विराज माइंगडे, वैभव नांगरे.
इलेक्ट्रिशन-ओंकार धनवडे,ओंकार कळंत्रे.
----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com