
चोरटे अटक
दोघा दुचाकी
चोरांना अटक
राशिवडे बुद्रुक, ता. ९ : दोन मोटरसायकल चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडुन राधानगरी पोलीसांनी चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.
तिटवे ( ता. राधानगरी) येथील प्रसाद अशोक पाटील आणि अर्जुनवाडा येथील करण नामदेव कांबळे यांना संशयितरित्या फिरताना राधानगरी पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांनी मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून राधानगरी पोलीस ठाणे हद्दीतील दोन, इस्पुर्ली हद्दीतील एक, कागल हद्दीतील एक अशा एकूण चार गुन्ह्यातील मोटरसायकली हस्तगत केल्या. ही कारवाही राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीपाद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड काँस्टेबल बी. डी. पाटील, के. डी. लोकरे, सुरेश मेटील, सचिन पारखे, नाईक कृष्णात यादव, गजानन गुरव, रणजीत वरुटे, कृष्णात साळुंखे, भैरवनाथ पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.