
राशिवडे यात्रा शुक्रवारपासून
राशिवडेत शुक्रवारपासून बिरदेव यात्रा
राशिवडे बुद्रुक : येथील ग्रामदैवत बिरदेव यात्रेस शुक्रवार (ता.३) पासून प्रारंभ होत आहे. यात्रेचा रविवार हा मुख्य दिवस आहे. पाच दिवसांच्या यात्रा कालावधीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. पहिल्या दिवशी देव मुख्य मंदिरातून पालखी मिरवणुकीने उत्सव मंदिरात होईल. दुसऱ्या दिवशी मानाचे नैवेद्य होतील. रविवारी अभिषेकसह अन्य धार्मिक विधीसह भाकणूक, हेडाम, आतषबाजी, सासनकाठी मिरवणूक, पालखीसोहळा आदी दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. यात्रे दरम्यान गणेश मंदिर ते मुख्य बाजारपेठ, नामानंद चौक दरम्यानचा रस्ता अवजड वाहनांसाठी बंद ठेण्यात येणार आहे. यात्रेची सांगता मंगळवारी (ता.७) होणार आहे. यात्रेदरम्यान ग्रामस्थांसह भाविकांना सर्व सुविधा देण्याचे नियोजन असल्याचे सरपंच संजीवनी पाटील, उपसरपंच अजिंक्य गोनुगडे यांनी सांगितले. रंकाळा बस स्थानकावरून जादा एसटी बसेसही सोडण्यात येणार आहेत.