चक्रेश्वर यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चक्रेश्वर यात्रा
चक्रेश्वर यात्रा

चक्रेश्वर यात्रा

sakal_logo
By

02156
चक्रेश्वरवाडीत महाशिवरात्र उत्साहात
आवळी बुद्रुक : चक्रेश्वरवाडी (ता. राधानगरी) येथील चक्रेश्वर महाशिवरात्र यात्रा उत्साहात झाली. जिल्ह्याभरातून आलेल्या हजारो शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे तीनपासून तपसा मठासह चक्रेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रम झाले. दुग्धाभिषेक, जलाभिषेक, पूजा, काकड आरती, ओम नम शिवाय नाम मंत्रजपासह बेल वाहणे आदी धार्मिक कार्यक्रम झाले. दुपारी बारा वाजता मंदिर प्रदक्षिणेसह पालखी सोहळा झाला. वळिवडेच्या सरपंच रूपाली कुसाळे यांच्यामार्फत सलग ११ व्या वर्षी खिचडी व ताक वाटप केले. तळाशी फ्रेंड्स सर्कलतर्फे खिचडी, लाडू वाटप झाले. पंचायत समितीचे आरोग्य पथक दिवसभर यात्रास्थळी उपस्थित होते. राधानगरी पोलिस, स्वराज्य रेस्क्यू फोर्स बिद्री आणि होमगार्ड यात्रा दिवसभर तैनात होते. ग्रामपंचायत सरपंच प्रियांका नरके, सदस्य व यात्रा कमिटीने उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम राबविले.