भोगावती शिक्षण मंडळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोगावती शिक्षण मंडळ
भोगावती शिक्षण मंडळ

भोगावती शिक्षण मंडळ

sakal_logo
By

‘भोगावती शिक्षण’च्या
निवडणुकीवर एकमत
परस्परविरोधी दावे मागे घेणार
राशिवडे बुद्रुक, ता. १६ : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाबाबत परस्परविरोधी दावे मागे घेऊन लगेचच निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी. यावर बुधवारी झालेल्या सुकाणू समिती बैठकीत एकमत झाले. जे शब्द फिरवतील त्यांच्या घरासमोर जनआंदोलन करू, असा इशारा सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील यांनी दिला. भोगावती महाविद्यालयात सर्वपक्षीय बैठक झाली.
सातत्याने मंडळावर सत्ता स्थापनेसाठी न्यायालयीन दावे होत आल्याने शिक्षण मंडळ वादग्रस्त ठरत आले आहे. गत निवडणुकीत सर्वपक्षीय आघाडी सत्तेवर आली आणि मंडळ सभासदांच्या मालकीचे झाल्याचा दावा केला. मात्र विद्यमान संचालक मंडळाने डिसेंबरमध्ये नवीन संचालक मंडळ स्थापन करून निवडणूक झाल्याचे दाखवल्याने ‘भोगावती’चे संचालक ए. डी. चौगले व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष केरबा पाटील यांनी संयुक्तिक दावा करून हे संचालक मंडळ बेकायदा असून निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली होती. सभासद सुनील पाटील यांनीही संचालक मंडळाविरोधात दावा केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून विद्यमान संचालक मंडळाने आपलेच संचालक मंडळ कायदेशीर असल्याचे धर्मादाय आयुक्तांना सांगितले होते.
हे सर्व दावे मागे घेण्यावर बैठकीत एकमत झाले. ३१ मार्चला सुकाणू समितीची बैठक घेऊन निवडणुकीबाबत दिशा ठरेल. जे दावे मागे घेणार नाहीत त्यांच्या घरासमोर जनआंदोलन करू, असे समितीचे अध्यक्ष डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंग हुजरे, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, संचालक, माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील, सदाशिवराव चरापले, संजय पाटील, माजी उपाध्यक्ष पी. डी. धुंदरे, अशोकराव पवार-पाटील, केरबा पाटील, एम. आर. पाटील, भाजपाचे अजित चव्हाण, सुभाष जाधव, नरके गटाचे निवास पाटील, जनता दलाचे वसंतराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जनार्दन पाटीलसह आजी-माजी संचालक उपस्थित होते. गोकुळ संचालक किसन चौगले यांनी आभार मानले.