४ पासून बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

४ पासून बंद
४ पासून बंद

४ पासून बंद

sakal_logo
By

राधानगरी- दाजीपूर राज्यमार्ग
४ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद

राधानगरी : एक एप्रिलपासून बंद होणारा राधानगरी- दाजीपूर पर्यंतचा राज्यमार्ग ठेकेदाराच्या तांत्रिक दिरंगाईमुळे चार दिवस लांबला आहे. आता हा राज्यमार्ग ४ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद होत आहे. दोन महिने म्हणजे ३१ मे पर्यंत या रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. कोल्हापूर, कोकण आणि कर्नाटकातून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. दोन महिन्याच्या काळात या रस्त्यावरील मोऱ्या, लहान पुलांची पुनर्बांधणी व डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. वाहतूक बंद करण्यासाठी रस्त्यादरम्यान वाहन चालकांच्या माहितीसाठी प्रमुख ठिकाणी दिशाचिन्हे आणि माहिती फलक लावण्यात आलेले नाहीत. पर्यायी मार्गाच्या प्रारंभाच्या ठिकाणी ठेकेदार कंपनीकडून वाहन चालकांना मार्गदर्शनासाठी सुरक्षारक्षक तैनात नाहीत. यामुळे मुदत वाढल्याचे समजते.
...

म्हासुर्ली परिसरात गव्यांचा वावर

धामोड : म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील सावरमळा परिसरात गव्यांचा वावर वाढला आहे. मुबलक चारा व पाणी उपलब्ध असल्याने गव्यांच्या कळपाने येथील शिवारातच वस्ती मांडली आहे. दरम्यान, येथील ऊस व मका पिकाचे गव्यांकडून नुकसान केले जात आहे. येथील परिसर जंगलव्याप्त आहे. धामणी नदीशेजारी मिळणारा मुबलक चारा, पाणी उपलब्ध असल्याने येथील सावरमाळा परिसरात गव्याच्या कळपाने वस्ती केली आहे. त्यामुळे रातोरात शेतातील ऊस पिक फस्त होत आहे . गव्यांच्या या वस्तीमुळे डोंगराजवळची शेती संकटात सापडली आहे . शेतकऱ्यांच्यामध्येही भितीचे वातावरण आहे. वन विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.