भोगावती अपात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोगावती अपात्र
भोगावती अपात्र

भोगावती अपात्र

sakal_logo
By

भोगावती कारखान्याच्या प्रारूप
यादीवरील आक्षेप फेटाळला

कागदपत्रांची पूर्तता न केल्याने ठरविले अपात्र

राशिवडे बुद्रुक, ता. २९ : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीवर विरोधकांनी घेतलेला आक्षेप फेटाळण्यात आला. प्रसिद्ध केलेल्या यादीतील २६८३ सभासद गहाळ असून ते पात्र ठरविण्यात यावेत, अशी विरोधकांनी मागणी केली होती. मात्र कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी सर्व सभासद अपात्र असल्याचे साखर सहसंचालक ए. व्ही. गाडे यांनी आज स्पष्ट केले.
भोगावती साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत गेल्यावर्षीच संपली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निवडणुका पुढे ढकलल्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला वाढ मिळाली आहे. सहकार निवडणूक विभागाकडून या कारखान्याची निवडणूक घोषित झाली असून याची कच्ची मतदार यादी ही जाहीर झाली आहे. यावर तक्रार देण्यासंदर्भात दिलेल्या मदतीमध्ये विरोधकांनी यादीमध्ये २६८३ मतदार गहाळ आहेत व ते जाणीवपूर्वक रद्द केल्याचे आरोप केले होते.
याबाबत साखर सहसंचालक यांच्यासमोर सुनावणी झाली. सर्व बाबींचा विचार करून या सर्व सभासदांनी कागदपत्रांची पूर्तता कारखान्याकडे न केल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे, असे नमूद करून ही मागणी फेटाळली आहे.